Dravid rejoins squad : भारत विरूद्ध श्रीलंका (Ind vs Sl) यांच्यात तिसरा वनडे (Third One day) सामना रविवारी खेळवण्यात येणार आहे. या सामन्याअगोदर टीम इंडियासाठी (Team India) एक आनंदाची बातमी आहे. टीमचे मुख्य कोच राहुल द्रविड (Rahul Dravid) हे पुन्हा टीमसोबत जोडले गेले आहेत. शुक्रवारी राहुल द्रविड यांची तब्येत बरी नसल्याचं समोर आलं होतं. मात्र आता टीमसोबत असल्याची माहिती मिळतेय.
टीम इंडिया आणि श्रीलंका (India vs Sri lanka) यांच्यातील तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना 15 जानेवारी रोजी तिरुअनंतपुरम येथे खेळवला जाणार आहे. या सामन्यापूवी टीम इंडियासाठी धक्कादायक बातमी समोर आली होती. प्रशिक्षक राहूल द्रविड (Rahul Dravid) यांची तब्येत अचानक बिघडली होती. शुक्रवारी सकाळी भारतीय संघ आणि उर्वरित सपोर्ट स्टाफ तिरुअनंतपुरमला तिसऱ्या सामन्यासाठी रवाना झाले होते. तर प्रशिक्षक राहुल द्रविड कोलकाताहून थेट बेंगळुरूला पोहोचले.
मीडिया रिपोर्टनुसार, राहुल द्रविडची (Rahul Dravid) प्रकृती ठीक नव्हती. त्यामुळेच ते बंगळुरूला रवाना झाले होते. द्रविडला रक्तदाबाची समस्या आहे, जी दुसऱ्या वनडेदरम्यान समोर आली होती. त्यानंतर बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली होती.
शुक्रवारी बीसीसीआयने द्रविड यांच्याबद्दल माहिती दिली होती. बीसीसीआयच्या म्हणण्याप्रमाणे, काळजी करण्यासारखं काहीही कारण नाहीये. ते शुक्रवारी पहाटे कोलकाताहून बेंगळुरूला रवाना झालेत. पण ते पूर्णपणे फिट आहे.
टीम इंडियाने गुरुवारी कोलकाता येथील ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेचा पराभव केला. या विजयासह टीम इंडियाने 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत 2-0 ने आघाडी घेतली आहे. त्यानंतर आता तिसऱ्या सामन्यात लंका दहन करून क्लिन स्वीप देण्याचा प्रयत्न रोहितसेना करणार आहे. अशातच आता तिसऱ्या सामन्यात कॅप्टन रोहित मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे.
श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यासाठी टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल केला जाण्याची शक्यता आहे. सूर्यकुमार यादवचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश केला जाऊ शकतो. सूर्याने श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत एक शतक आणि एक अर्धशतक झळकावलं होतं. त्याच्याशिवाय ईशान किशनलाही तिसऱ्या वनडेत संधी मिळू शकते, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. या दोघांशिवाय अर्शदीप आणि अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर यांचाही तिसऱ्या वनडे समावेश होणार आहे.