IND vs SL Test Series | श्रीलंका विरुद्धच्या कसोटी मालिकेत हा घातक बॅट्समन घेऊ शकतो पुजाराची जागा

टीम इंडिया (Team India) विरुद्ध श्रीलंका यांच्यात 4 मार्चपासून 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेला (IND vs SL Test Series) सुरुवात होणार आहे. 

Updated: Mar 1, 2022, 04:56 PM IST
IND vs SL Test Series | श्रीलंका विरुद्धच्या कसोटी मालिकेत हा घातक बॅट्समन घेऊ शकतो पुजाराची जागा title=
प्रातिनिधिक छायाचित्र

मुंबई : टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यात 4 मार्चपासून 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेला (IND vs SL Test Series) सुरुवात होणार आहे. या मालिकेसह टीम इंडियाच्या एका नव्या पर्वाला सुरुवात होणार आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma) पहिल्यांदाच टीम इंडियाच्या कर्णधाराची जबाबदारी स्वीकारेल. तसेच या पहिल्या सामन्यापासून टीम इंडियाच्या मीडल ऑर्डरमध्ये मोठे बदल होणार आहेत. (ind vs sl test series team india captain rohit sharma might give to chance mumbaikar shreyas iyer from batting at 3rd spot)  
  
श्रीलंका विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी चेतेश्वर पुजाराला डच्चू देण्यात आलाय. त्यामुळे श्रेयसला पुजाराच्या जागी तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंगची संधी मिळू शकते.

श्रेयसची धमाकेदार कामगिरी

श्रेयस अय्यर गेल्या काही दिवसांपासून धमाकेदार कामगिरी करतोय. श्रेयसने श्रीलंका विरुद्धच्या 3 सामन्यांच्या टी 20 मालिकेत सलग 3 अर्धशतकं ठोकली होती.

श्रेयस भारतात अशी कामगिरी करणारा टीम इंडियाचा पहिलाच बॅट्समन ठरला. तसंच श्रेयसने 3 सामन्यांच्या टी 20 मालिकेत सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत विराट कोहलीला मागे टाकलं.

श्रेयसने श्रीलंका विरुद्धच्या या मालिकेत 204 धावा केल्या. विशेष म्हणजे श्रेयस तिन्ही वेळा नॉट आऊट राहिला. श्रेयसला या कामगिरीसाठी 'मॅन ऑफ द सीरिज' घोषित करण्यात आलं.

टेस्ट डेब्यूत शतक

श्रेयसने कसोटी पदार्पणात धमाकेदार कामगिरी केली होती. त्याने न्यूझीलंड विरुद्ध पदार्पण केलं होतं. या सामन्यातील पहिल्या डावात 105 तर दुसऱ्या डावात 65 धावांची खेळी केली होती. त्यामुळे कॅप्टन रोहित श्रेयसला या टेस्ट सीरिजमध्ये पुजाराच्या जागी संधी देऊ शकतो. 
 
कसोटी मालिकेसाठी टीम इंडिया :  रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), प्रियांक पांचाळ, मयंक अग्रवाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, शुबमन गिल, ऋषभ पंत (विकेटकीपर), केएस भरत, रवींद्र जाडेजा, जयंत यादव, आर अश्विन, कुलदीप यादव, सौरभ कुमार, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि मोहम्मद शमी.