IND vs SL : श्रीलंका दौऱ्यापूर्वी मोठा धक्का! हा स्टार मॅचविनर खेळाडू जायबंदी, मालिकेतून बाहेर

India vs Sri Lanka Series : भारतीय संघ श्रीलंकेला पोहोचला असताना आता दुष्मंथा चमिरा (Dushmantha Chameera) टी-20 मालिकेतून बाहेर पडलाय आहे.

सौरभ तळेकर | Updated: Jul 24, 2024, 04:49 PM IST
IND vs SL : श्रीलंका दौऱ्यापूर्वी मोठा धक्का! हा स्टार मॅचविनर खेळाडू जायबंदी, मालिकेतून बाहेर title=
IND vs SL T20 Series Dushmantha Chameera

IND vs SL T20 Series : नवा कॅप्टन आणि नव्या कोचसह भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर गेला आहे. या दौऱ्यात टीम इंडिया तीन टी-ट्वेंटी मालिका आणि तीन वनडे मालिका खेळणार आहेत. अशातच 27 जुलै रोजी पहिला टी-ट्वेंटी सामना खेळवला जाईल. मात्र, पहिल्या सामन्यापूर्वीच श्रीलंकेला मोठा धक्का बसला आहे. श्रीलंकेचा स्टार गोलंदाज दुश्मंता चमिरा (Dushmantha Chameera) हा दुखापतीमुळे संघातून बाहेर पडलाय. संपूर्ण दौऱ्यातून चमिरा बाहेर झाल्याने आता श्रीलंकेला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे आता चमिराच्या जागी कोणाची नियुक्ती होणार? यावर चर्चा सुरू आहे.

टी-20 विश्वचषकातील खराब कामगिरीनंतर वानिंदू हसरंगाने कर्णधारपदावरून पायउतार झाल्यानंतर चरित असलंकाकडे संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आलंय. अशातच श्रीलंकेच्या मीडिया रिपोर्ट्सनुसार, दुष्मंथा चमिराला टी-20 मालिकेतून बाहेर पडलाय. श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने यावर अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही. श्रीलंकेसाठी चमिरा महत्त्वाचा गोलंदाज आहे. त्याने 55 टी-ट्वेंटी सामन्यात 55 विकेट्स नावावर केले आहेत. तर आयपीएलमध्ये देखील त्याने चमक दाखवली आहे. 

भारत विरूद्ध श्रीलंका यांच्यातील टी-20 सामने संध्याकाळी 7 वाजता सुरु होणार आहेत. यावेळी पहिली T20 27 रोजी, दुसरी T20 28 रोजी आणि शेवटचा T20 सामना 30 जुलै रोजी खेळवला जाईल. भारत विरूद्ध श्रीलंका यांच्यामधील होणारे टी-20 सामने आणि वनडे सामन्यांच्या सिरीजचं प्रसारण सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर होणार आहे.  

टी-ट्वेंटी मालिकेसाठी श्रीलंकेचा संघ - चरिथ असलंका (C), पथुम निसांका, कुसल परेरा, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस, दिनेश चंडीमल, कामिंदू मेंडिस, दासुन शनाका, वानिंदू हसरंगा, महिश तिक्षणा, चामिंदू विक्रमसिंगे, मथिशा पाथिराना, नुवान थुसारा, दुनिथ वेल्लालागे, दुश्मंता चामिरा (Injured), बिनुरा फर्नांडो. 

टी-ट्वेंटी मालिकेसाठी टीम इंडियाचा संघ - सूर्यकुमार यादव (C), शुबमन गिल (VC), यशस्वी जयस्वाल, रिंकू सिंग, रियान पराग, ऋषभ पंत (WK), संजू सॅमसन (WK), हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोनी, अर्शदीप सिंग, खलील अहमद आणि मोहम्मद सिराज.