IND vs SL : ऋषभ पंत बाबत हार्दिक पंड्याच मोठं विधान, म्हणाला...

IND vs SL : भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध (India vs sri lanka) तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 3 जानेवारीला होणार आहे. या मालिकेत हार्दिक पंड्या टीम इंडियाचे नेतृत्व करणार आहे.

Updated: Jan 3, 2023, 01:12 PM IST
IND vs SL : ऋषभ पंत बाबत हार्दिक पंड्याच मोठं विधान, म्हणाला... title=

Hardik Pandya On Rishabh Pant : टीम इंडिया उद्या मंगळवारपासून हार्दिक पंड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वाखाली श्रीलंकेविरूद्ध 3 सामन्यांची टी20 मालिका खेळणार आहे. या मालिकेपुर्वी हार्दिक पंड्याची पत्रकार परिषद पार पडली आहे. या पत्रकार परिषदेत त्याने या टी20 मालिकेसंबंधीत आणि ऋषभ पंतबाबत (Rishabh Pant) अनेक उत्तरे दिली आहे. नेमकं या पत्रकार परिषदेत काय म्हणालाय, ते जाणून घेऊयात.   

टीम इंडिया आणि श्रीलंका (India vs sri lanka) यांच्यातील पहिला T20 सामना मंगळवारी (3 जानेवारी) मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्यापूर्वी हार्दिक पंड्याची (Hardik Pandya) पत्रकार परिषद पार पडलीय. या पत्रकार परिषदेत हार्दिक पंड्या म्हणाला की, टीम इंडिया (Team India) वर्ल्ड कपवर लक्ष केंद्रित करत आहे. तसेच ऋषभ पंतसोबत (Rishabh Pant) संपुर्ण संघ उभा आहे. 

 

हे ही वाचा :  हार्दिक पंड्याने सांगितला टीम इंडियाच्या नवीन वर्षाचा संकल्प

 

ऋषभ पंतबाबत काय म्हणाला? 

पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच हार्दिकने ऋषभ पंतशी (Rishabh Pant) संबंधित प्रश्नाचे उत्तर दिले. तो म्हणाला, ऋषभ पंत सोबत जे घडले ते दुर्दैवी होते. आमचे प्रेम, आमच्या प्रार्थना त्याच्या पाठीशी असल्याचे हार्दिक पंड्या म्हणालाय. तसेच तो संघासाठी महत्त्वाचा खेळाडू आहे. आम्हाला पुढील मूल्यमापन करणे आवश्यक आहे. त्याच्या अनुपस्थितीत इतरांना संधी मिळेल. संघातील त्याच्या अनुपस्थितीने मोठा फरक पडेल, असे देखील हार्दिक पंड्या पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देता म्हणालाय. 

घटनाक्रम काय?

ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) कारला शुक्रवारी 30 डिसेंबरच्या पहाटे भीषण अपघात झाला होता. रुरकीजवळील मोहम्मदपूर जाट भागात पंतच्या गाडीला अपघात झाला. या अपघातातून त्याला हरयाणा परिवहन मंडळाचा ड्रायव्हर सुशील मान आणि वाहक परमजीत सिंगने वाचवले होते. मात्र अपघातात पंतच्या गुडघ्यात फ्रॅक्चर झाले आहे. त्याच्या कपाळावर टाके पडले आहेत. हाताला आणि पाठीलाही दुखापत झाली आहे. या अपघातानंतर तो बराच काळ व्यावसायिक क्रिकेटपासून दूर राहू शकतो. पंतला पूर्णपणे बरे होण्यासाठी किमान सहा महिने लागतील, असे मानले जात आहे.

पाच डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार

जखमी ऋषभ पंतला (Rishabh Pant) तात्काळ डेहरादूनच्या मॅक्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. या रुग्णालयात गेल्या तीन दिवसांपासून ऋषभ पंतवर उपचार सुरु आहेत. ऋषभ पंतची प्रकृती आता स्थिर असून सुधारणा होत आहे. ऋषभ पंतच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांनी माहिती देताना सांगितलं की, त्याला आयसीयूमधून खासगी वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आलं आहे. पाच डॉक्टरांच्या टीमच्या देखरेखीखाली उपचार सुरु आहेत. तसेच ऋषभ पंतही उपचारांना चांगला प्रतिसाद देत आहे. 

दरम्यान भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध (India vs sri lanka) तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 3 जानेवारीला होणार आहे. या मालिकेत हार्दिक पंड्या टीम इंडियाचे नेतृत्व करणार आहे. या सामन्याची भारतीय क्रिकेट फॅन्सना उत्सुकता लागलीय.