भारताच्या जर्सीवर लिहिण्यात आलं 'Killer', नेमकं काय आहे प्रकरण?

नवीन वर्षी Team India ची जर्सी झाली 'Killer', फोटो झालेत Viral  

Updated: Jan 2, 2023, 07:56 PM IST
भारताच्या जर्सीवर लिहिण्यात आलं 'Killer', नेमकं काय आहे प्रकरण?  title=

New kit sponsor for Indian cricket team : श्रीलंका आणि भारतामध्ये उद्यापासून म्हणजेच 3 जानेवारीपासून टी-20 मालिकेला सुरूवात होत आहे. यंदाच्या वर्षातील 2023 मधील ही पहिलीच मालिका असून हार्दिक पंड्याकडे संघाचं कर्णधारपद सोपवण्यात आलं आहे. या मालिकेआधी टीम इंडियाच्या जर्सीमध्ये बदल झालेले दिसत आहेत. (ind vs Sl New kit sponsor for Indian cricket team latets marathi sport news)

नेमके कोणते बदल झालेत?
टीम इंडियाच्या किटची स्पॉन्सरशीप एमपीएल स्पोर्ट्सकडे (MPL Sports) होती. करारानुसार 2023 पर्यंत ही स्पॉन्सरशीप राहणार होती. आता स्पॉन्सरशीप Kewal Kiran Clothing Limit  या कंपनीकडे देण्यात आली आहे. याआधी MPL कंपनीचा लोगो जर्सीवर असायचा त्या जागी आता Kewal Kiran Clothing Limit कंपनीच्या लोगोसह किलर असं लिहिलेलं दिसणार आहे.

युजवेंद्र चहलने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये, युजवेंद्र चहल व्यतिरिक्त उमरान मलिक, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार आणि ऋतुराज गायकवाड आहे. पोस्ट केलेल्या फोटोमध्ये नवीन जर्सी कशी असणार याची झलक दिसत आहे.

भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला टी-20 सामना मुंबईमधील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यासाठी कोविड संदर्भात कुठली ही सूचना आली नाही, त्यामुळे संपूर्ण स्टेडियम मधील तिकीट उपलब्ध असणार आहे. भारत विरुद्ध श्रीलंकेमधील तीन सामन्यांची मालिका होणार असून तिन्ही सामने पहिला सामना मुंबई, दुसरा पुणे तर तिसरा सामना राजकोट येथे होणार आहे. पुण्यामध्ये दुसरा सामना 5 जानेवारीला होणार आहे. 

 

टी-20 मालिकेसाठी टीम इंडिया-
हार्दिक पंड्या (कर्णधार), सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), इशान किशन, ऋतुराज गायकवाड, शुबमन गिल, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, उमरान मलिक, शिवम मावी आणि मुकेश कुमार