Virat Kohli : यंदाचं वरीस विराटचं, 2023 ठरणार 'लकी'; कोणते कोणते रेकॉर्ड मोडणार?

Virat Kohli 2023:  पाकिस्तानविरुद्ध हरिस राऊफला समोरून षटकार खेचलेला विराट आता सर्व बंधणं जुगारून पुन्हा कम बॅक करत होता. मागील दोन वर्ष विराटसाठी चांगली गेली नाहीत. वर्षाच्या अखेरीस विराट पुन्हा फॉर्ममध्ये आलाय.

Updated: Jan 15, 2023, 11:58 PM IST
Virat Kohli : यंदाचं वरीस विराटचं, 2023 ठरणार 'लकी'; कोणते कोणते रेकॉर्ड मोडणार? title=
Virat Kohli

Virat Kohli: बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असं म्हणतात. कोहलीच्या मानसिक कणखरतेची प्रचिती 2006 मध्येच आली होती. खणखणीत शतक (virat kohli century) झळकावत कोहलीने सिलेक्टर्सला खडबडून जागं केलं. विराटचा तोच तोरा गेल्या वर्षी दिसून आला. दोन वर्षांपासून सुरु असलेल्या शतकांचा दुष्काळ विराटने संपवला आणि त्यावेळी चेहऱ्यावरची स्माईल सर्वकाही सांगत होती. त्याच मानसिक कणखरतेची प्रचिती पुन्हा एकदा दिसून आली होती. भगवान देता है छप्पर फाडके देता है, असा वाक्यप्रचार विराटसाठीच बनलाय, असं म्हटलं तर वागवं ठरणार नाही. (Virat Kohli successor this year, 2023 will be lucky Which records will be broken marathi news)

माजी क्रिकेटपटूंसह चाहत्यांनी विराटवर (Virat Kohli) टीकेची झोड उडवली होती. मात्र, कोहली टिकून राहिला. साध्या साध्या बॉलवर विराटची विकेट जात होती. त्यानंतर पाकिस्तानविरुद्ध हरिस राऊफला समोरून षटकार खेचलेला विराट आता सर्व बंधणं जुगारून पुन्हा कम बॅक करत होता. मागील दोन वर्ष विराटसाठी चांगली गेली नाहीत. वर्षाच्या अखेरीस विराट पुन्हा फॉर्ममध्ये आला आणि भल्या भल्या गोलंदाजाचं टेन्शन वाढलं.

यंदाचं वरीस विराटचं...

यंदाच्या वर्षात विराट कोहलीनं अवघ्या तीन वनडे सामन्यात दोन शतकं ठोकली आहेत. त्यामुळे 2023 या वर्षात विराटचा दबदबा कायम राहणार का?, असा प्रश्न विचारला जातोय. वर्षाच्या सुरूवातीलाच कोहलीने विक्रमी कामगिरी केलीये. भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील (IND vs SL 3rd ODI) वनडे मालिकेतील तिसऱ्या सामन्यात किंग कोहलीने दमदार शतक ठोकलं. विराट कोहलीचं हे 74 वे शतक असून तो श्रीलंका विरुद्ध एकाच वनडे सामन्यात लागोपाठ दोन शतक करण्यास यशस्वी ठरलाय.

श्रीलंकेविरूद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात (IND vs SL) टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीने मोठा रेकॉर्ड केला आहे. विराट कोहलीने सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत 5 वा क्रमांक पटकावला आहे. विशेष म्हणजे विराटने श्रीलंकेविरूद्ध खेळताना श्रीलंकेचा माजी दिग्गज खेळाडू महिला जयवर्धनेला मागे टाकत टॉप 5 मध्ये स्थान मिळवलं.

आणखी वाचा - IND vs SL: हे फक्त Virat Kohli चं करू शकतो, एकाच दिवशी ठोकली 4 शतकं

कोहलीने भारतात आपलं 21 वं शतक झळकावलं. यासह, तो कोणत्याही एका देशात सर्वाधिक शतकं ठोकणाऱ्या सचिन तेंडुलकरच्या (Sachin Tendulkar) 20 शतकांच्या आकड्याच्या पुढे गेला आहे. तर विराटने आत्तापर्यंत वनडे सामन्यात 46 शतक झळकावली आहेत. तर दुसरीकडे सचिन तेंडूलकरच्या नावावर 49 शतकांचा भलामोठा रेकॉर्ड आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षात विराट सचिन तेंडूलकरला मागे टाकणार का?, असा सवाल उपस्थित होतोय.

दरम्यान, या वर्षी भारतात वनडे वर्ल्ड कप खेळवला जाणार आहे. त्यामुळे आता चालू वर्षात अनेक सामने खेळवले जाणार आहेत. त्यामुळे या वर्षी विराट नावाला साजेरी कामगिरी करेल आणि सर्व रेकॉर्ड मोडीस काढेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सचिनचा विक्रम हाताच्या बोटावर मोजता येईल इतक्याच खेळाडूंच्या नावावर आहे. घरच्यांच्या साक्षीने शतकांचा दुष्काळ संपवण्याची नामी संधी कोहलीकडे आहे.