IND vs SL 2nd Test | R Ashwin चा धमाका, 'स्टेन' गनला मागे टाकत रेकॉर्ड ब्रेक

टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात (IND vs SL 2nd Test)  इतिहास रचला गेला आहे.

Updated: Mar 14, 2022, 04:52 PM IST
IND vs SL 2nd Test | R Ashwin चा धमाका, 'स्टेन' गनला मागे टाकत रेकॉर्ड ब्रेक title=
प्रातिनिधिक छायाचित्र

मुंबई : टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात (IND vs SL 2nd Test)  इतिहास रचला गेला आहे. टीम इंडियाचा अनुभवी फिरकीपटू रवीचंद्रन अश्विनने सर्वाधिक कसोटी विकेट्सच्या बाबतीत दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज 'स्टेन गन' या नावाने परिचित असलेल्या डेल स्टेनला मागे टाकलं आहे. डेल स्टेनच्या नावावर टेस्टमध्ये 439 विकेट्स होत्या. आता अश्विन त्याला पछाडत त्याच्या पुढे निघाला आहे. (ind vs sl 2nd test day 3 team india spinner ravinchandran ashwin has break dale steyn 439 test wickets record at m chinnaswamy stadium bengaluru)  

तसेच कसोटीमध्ये सर्वाधिक कसोटी विकेट्स (Most Wickets In Test Cricket) घेणाऱ्यांच्या यादीत अश्विन आठव्या स्थानी पोहचला आहे. या 8 गोलंदाजांपैकी अश्विनचा अपवाद वगळता 2 गोलंदाजच सध्या खेळत आहेत. हे दोन्ही इंग्लंडचेच गोलंदाज आहेत. स्टुअर्ट ब्रॉड आणि जेम्स एंडरसन हे सक्रीय आहेत. तर उर्वरित 5 जण हे निवृत्त झाले आहेत.

अश्विनसाठी श्रीलंका विरुद्धची ही कसोटी मालिका फार विशेष ठरली आहे. अश्विनने मोहालीत झालेल्या पहिल्या कसोटीत कपिल देव यांचा 434 टेस्ट विकेट्सचा विक्रम मोडित काढला होता. त्यानंतर आता त्याने स्टेनला मागे टाकलं आहे. 

अश्विनकडे अनेक विक्रम करण्याची संधी आहे. टीम इंडियाला या वर्षात आणखी इंग्लंड विरुद्ध एक कसोटी खेळायची आहे. तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेत 6 कसोटी सामने खेळायचे आहेत. यापैकी 4 ऑस्ट्रेलिया तर उर्वरित 2 सामने हे बांगलादेश विरुद्ध खेळायचे आहेत.