IND vs SL : पहिल्या टी-20 सामन्यावर कोरोनाचं सावट; BCCI लावणार का निर्बंध?

श्रीलंकेविरूद्ध 3 सामन्यांची टी-20 सिरीज खेळवण्यात येणार आहे. यामध्ये पहिला सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium Mumbai) होणार आहे. कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता, मुंबईत नवे गाईडलाईन्स जाहीर करण्यात आले आहेत. 

Updated: Dec 25, 2022, 10:57 PM IST
IND vs SL : पहिल्या टी-20 सामन्यावर कोरोनाचं सावट; BCCI लावणार का निर्बंध? title=

IND vs SL 1st T20 2023: श्रीलंका क्रिकेट टीम (Sri Lanka Cricket Team) नव्या वर्षाच्या सुरुवातीला भारताच्या दौऱ्यावर येणार आहे. श्रीलंकेविरूद्ध 3 सामन्यांची टी-20 सिरीज खेळवण्यात येणार आहे. यामध्ये पहिला सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium Mumbai) होणार आहे. कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता, मुंबईत नवे गाईडलाईन्स जाहीर करण्यात आले आहेत. यावेळी परदेशातून येणाऱ्या लोकांसाठी पुन्हा आरटी पीसीआर चाचणी करणे अनिवार्य करण्यात आलंय.

भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिली टी-20 मॅच वानखेडेमध्ये होणार आहे. या सामन्यासाठी पेटीएम इनसायडरवर तिकीटांची विक्री सुरु कऱण्यात आली आहे. मात्र सामना पहायला येणाऱ्या प्रेक्षकांसाठी तसंच खेळाडूंसाठी काही नियम लागू होऊ शकतात. कोरोना आऊटब्रेक झाल्यानंतर हे नियम लागू करण्यात आले होते, पण कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर हे नियम संपुष्टात आले.

प्रेक्षकांच्या संख्येवर मर्यादा नाही

भारत आणि श्रीलंका सिरीजदरम्यान प्रेक्षकांच्या संख्येवर मर्यादा लादण्यात आलेली नाही. मात्र यावेळी सामना पाहयला येणाऱ्या प्रेक्षकांसाठी मास्कचा वापर अनिवार्य केला जाऊ शकतो. त्याचबरोबर ज्येष्ठ व्यक्तींना तसंच आजारी व्यक्तींना प्रवेश नाकारला जाऊ शकतो.

इतंकच नाही तर बीसीसीआय जुने नियम लागू करू शकते. या जुन्या नियमांमध्ये प्रेक्षकांनी जवळ न जाणं, बाहेरील व्यक्तींना न भेटणं यांचा समावेश आहे. 

टीम इंडियाला मोठा धक्का

दुखापतीच्या कारणामुळे टीमचा नियमिक कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) टी-20 सिरीज खेळणार नाहीये. बांगलादेशाविरूद्ध झालेल्या वनडे सिरीजच्या दुसऱ्या सामन्यात नियमित कर्णधार (Rohit Sharma) ला दुखापत झाली होती. त्यावेळी त्याच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. यामुळे त्याने टेस्ट सिरीजमध्ये भाग घेतला नव्हता. अशातच आता याच दुखापतीमुळे तो श्रीलंकेविरूद्धच्या टी-20 सिरीजमधून बाहेर झाला आहे. 

पीटीआयच्या अहवालानुसार, रोहित शर्मा (Rohit Sharma Injury Update) अजूनही त्याच्या दुखापतीतून सावरला नाहीये. त्यामुळे रोहित टी-20 सिरीजमध्ये खेळू शकणार नाहीये.