Video : हमारी भाभी कैसी हो..! शुभमन गिलसमोर किंग कोहलीने दिली अशी रिअ‍ॅक्शन; तुम्हीही पोटधरून हसाल

India vs South Africa : हमारी भाभी कैसी हो विराटने चाहत्यांना या घोषणा थांबवण्याचा इशारा केला. नो नो.. असं कोहली बोटांनी सांगत होता. शुभमन गिलने (Shubhman gill) या घोषणांकडे दुर्लक्ष केलं. मात्र, विराटने भन्नाट रिअॅक्शन दिली.

Updated: Nov 5, 2023, 11:02 PM IST
Video : हमारी भाभी कैसी हो..! शुभमन गिलसमोर किंग कोहलीने दिली अशी रिअ‍ॅक्शन; तुम्हीही पोटधरून हसाल title=
hamari bhabhi kaisi ho Ind vs Sa Virat kohli reaction

Virat kohli Funny Video : टीम इंडियाने वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत (World Cup 2023) सलग आठव्या विजयाची नोंद केलीये. विराट कोहलीने विक्रमी 49 वं शतक झळकावून सचिन तेंडुलकरच्या (Sachin Tendulkar) वनडेतील सर्वाधिक शतकाच्या विक्रमाशी बरोबरी केली. त्यानंतर रविंद्र जडेजाने 5 विकेट्स घेवून साऊथ अफ्रिकेला ठेंगा दाखवला. भारताने विजयासाठी ठेवलेल्या 327 धावांच्या उत्तरात दक्षिण आफ्रिकेचा संघ 27.1 षटकात 83 धावांवर तंबूत परतला. त्यामुळे आता टीम इंडियाने (India on top of Points table) अंकतालिकेत अव्वल स्थानी झेप घेतली आहे. अशातच सामन्यावेळीचा एक व्हिडीओ (Viral Video) सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये विराट कोहलीची (Virat kohli ) रिअॅक्शन पाहून तुम्हीही पोटधरून हसाल.

टीम इंडियाचा प्रिन्स शुभमन गिल (Shubhman Gill) आणि  सारा तेंडुलकर (Sara Tendulkar) हे दोघं रिलेशनमध्ये असल्याच्या चर्चा मागच्या मोठ्या काळापासून आहेत. याच पार्श्वभूमीवर चाहत्यांकडून लाईव्ह सामन्यात घोषणाबाजी झाली. हमारी भाभी कैसी हो, सारा भाभी जैसी हो, अशा घोषणा प्रेक्षकांनी देणं सुरू केल्या. टीम इंडिया फलंदाजी करत असताना प्रेक्षकांनी सारा भाभी, असा सुर लगावला. दर सामन्यावेळी विराट प्रेक्षकांना असा घोषणा देताना प्रोत्साहन देत असतो. मात्र, यावेळी विराटने प्रेक्षकांना रोखलं. त्याचं कारण काय असेल पाहा...

हमारी भाभी कैसी हो विराटने चाहत्यांना या घोषणा थांबवण्याचा इशारा केला. नो नो.. असं कोहली बोटांनी सांगत होता. शुभमन गिलने या घोषणांकडे दुर्लक्ष केलं. मात्र, विराटने भन्नाट रिअॅक्शन दिली. मी शुभमनच्या जवळ थांबलोय. मला मार खायला लावता का? असं विराटने म्हटल्याचं व्हिडीओमधून पहायला मिळतंय. 

पाहा Video

टीम इंडिया - रोहित शर्मा (C), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (WK), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज.

दक्षिण आफ्रिका – क्विंटन डी कॉक (WK), टेम्बा बावुमा (C), रासी व्हॅन डर ड्युसेन, एडेन मार्करम, हेन्रीच क्लासेन, डेविड मिलर, मार्को यान्सेन, केशव महाराज, तबरेझ शम्सी, कागिसो रबाडा, लुंगी एन्गिडी.