IND vs SA : टीम इंडियाला मोठा धक्का, ऑलराउंडरसह 3 खेळाडू मालिकेतून बाहेर

टीम इंडियाचे 2 स्टार खेळाडू दीपक हुडा (Deepak Hudda) आणि मोहम्मद शमी (Mohameed Shmai) दुखापतीमुळे या मालिकेतून बाहेर पडले आहेत.    

Updated: Sep 26, 2022, 10:57 PM IST
IND vs SA : टीम इंडियाला मोठा धक्का, ऑलराउंडरसह 3 खेळाडू मालिकेतून बाहेर title=

मुंबई : ऑस्ट्रेलियाचा टी 20 मालिकेत 2-0 ने पराभव केल्यानंतर टीम इंडिया दक्षिण आफ्रिका (IND vs SA T 2O Series) विरुद्ध भिडणार आहे. या मालिकेला  28 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. मात्र त्याआधी टीम इंडियाला (Team India) मोठा झटका बसला आहे. पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, टीम इंडियाचे 2 स्टार खेळाडू दीपक हुडा (Deepak Hudda) आणि मोहम्मद शमी (Mohameed Shmai) दुखापतीमुळे या मालिकेतून बाहेर पडले आहेत. यासोबतच बीसीसीआयने (Bcci) हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) विश्रांती दिली होती. या तीन खेळाडूंच्या अनुपस्थितीत भारतासाठी मालिकेत अडचणी निर्माण होऊ शकतात. (ind vs sa t20 series team india big blow hardik pandya mohameed shmai and deepak hodda ruled out against south africa)  

या तीन खेळाडूंना संधी

पीटीआयनुसार, आता हार्दिक पांड्याऐवजी अष्टपैलू शाहबाज अहमदला संघात स्थान मिळालं आहे. दुसरीकडे दीपक हुडाच्या जागी श्रेयस अय्यरचा तर मोहम्मद शमीच्या जागी उमेश यादवचा समावेश करण्यात आला आहे. उमेश यादव संघासह तिरुअनंतपुरमला पोहोचला आहे. 

टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका वेळापत्रक

पहिली टी20 मॅच - 28  सप्टेंबर  
दूसरी टी20 मॅच - 2 ऑक्टूबर
तिसरी टी20 - 4 अक्टूबर

वनडे सीरिज

पहिली वनडे- 6 ऑक्टोबर
दूसरी वनडे - 9 ऑक्टोबर
तिसरी वनडे- 11 ऑक्टूबर

साउथ अफ्रीका विरुद्धच्या टी 320 सीरिजसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), आर अश्विन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंह, हर्षल पटेल, दीपक चाहर, जसप्रीत बुमराह, उमेश यादव आणि श्रेयस अय्यर.