मुंबई : इंग्लंडविरूद्धच्या सामन्यात भारतीय महिला खेळाडू दीप्ती शर्माने (Deepti Sharma) मंकडिंग पद्धतीने चार्ली डीनला (Charlotte Dean) नॉन-स्ट्रायकर असताना रनआऊट करत सामन्यात विजय मिळवला होता. या रनआऊटनंतर मोठा वाद रंगला होता. अनेक माजी दिग्गज खेळाडूंमध्ये देखील वाद झाला होता. मात्र आता या प्रकरणात दीप्ती शर्माने मौन सोडलं आहे. या रनआऊट दरम्यान नेमकं काय घडलं होत याचा किस्साच तिने सांगितला आहे.
हरमनप्रीत कौरच्या (Harmanpreet Kaur) नेतृत्वाखाली टीम इंडियाने इंग्लंडला त्यांच्याच घरात क्लीन स्वीप करून पराभूत केले होते. या मालिकेतील शेवटच्या सामन्य़ात दीप्ती शर्माने (Deepti Sharma) मंकडिंग पद्धतीने चार्ली डीनला (Charlotte Dean) नॉन-स्ट्रायकर असताना रनआऊट केल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. या वादावर आता प्रथमच दीप्ती शर्माने प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाली दीप्ती शर्मा?
दीप्ती शर्मा (Deepti Sharma) भारतात परतली आहे. यावेळी तिला त्या वादग्रस्त रनआउटबद्दल विचारण्यात आले. ज्यावर दीप्तीने स्पष्टपणे सांगितले की, आम्ही सर्व काही नियमानुसार केले आहे. तिला आम्ही वारंवार इशारा दिला होता, असे तिने म्हटले आहे.
दीप्ती (Deepti Sharma) पुढे म्हणते की,हा आमच्या रणनीतीचा भाग होता. आम्ही तिला वारंवार इशारा दिला होता. नियमानुसार जे काही तेच आम्ही केले असल्याचे स्पष्टीकरण तिने यावेळी दिले. प्रत्येक संघाला जिंकायचे होते आम्हालाही विजय मिळवून झूल्लन गोस्वामी यांना निरोप द्यायचा होता,असे ही ती म्हणाली.
आम्ही सर्वांनी अंपायर्सना सांगितले होते की, ती पुन्हा पुन्हा क्रीजच्या बाहेर जात आहे.जेव्हा तिने पुन्हा तशीच चुक केली तेव्हा आम्ही तिला बाद केले. दीप्ती शर्माच्या (Deepti Sharma) या रनआउटनंतर क्रिकेट विश्वात एक नवीन वाद सुरू झाला होता.
Stay in the crease Rules are Rules.
Deepti SharmaGore Bahut Rone Wale Hai #ENGvIND pic.twitter.com/EimxtBMG5Q
— AKASH (@im_akash196) September 24, 2022
टीम इंडियाने (Team India) इंग्लंडला त्यांच्याच घरात क्लीन स्वीप करून पराभूत केले आहे. हरमनप्रीत कौरच्या (Harmanpreet Kaur) नेतृत्वाखाली भारताने हा इतिहास रचला. या विजयासह टीम इंडियाने झुल्लन गोस्वामीला निरोप दिला.