मुंबई : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टीम इंडियाला सलग दुसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. पंतच्या नेतृत्वात टीम इंडियाला एकही सामना जिंकण्यात अजूनतरी यश आलं नाही. त्यामुळे क्रिकेटप्रेमी आणि निवड समिती दोघंही रोहित शर्माला खूप मिस करत असल्याचं दिसत आहे. दुसरा सामना हातून गेल्यानंतर पंत चिडल्याचं पाहायला मिळाला. पंत रागाने लालबुंद झाला आणि त्याने टीममधील खेळाडूंना सामना जाण्यामागे कारणीभूत ठरवलं.
सामन्यानंतर टीम इंडियाचा कॅप्टन ऋषभ पंत म्हणाला की, आम्ही 10 ते 15 धावा कमी केल्या. भुवनेश्वर कुमार आणि वेगवान गोलंदाजांनी पहिल्या 7-8 षटकांमध्ये उत्तम बॉलिंग केली. त्यानंतर आम्हाला विकेट घेता आली नाही. मधल्या ओव्हर्समध्ये आम्हाला विकेट्स मिळायला हव्या होत्या.
हेनरिक क्लासेन आणि टेम्बा बावुमाचे कौतुक करताना पंत म्हणाला की त्यांनी खरोखरच उत्तम कामगिरी केली. त्याची विकेट काढणं कठीण गेलं. पुढच्या सामन्यात आम्ही झालेल्या चुका सुधारू आणि चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करू. उरलेले तीन सामने जिंकणं टीम इंडियासाठी महत्त्वाचं आहे.
स्पिनर्सने दुसऱ्या सामन्यात अत्यंत वाईट कामगिरी केली. युजवेंद्र चहलने 4 ओव्हरमध्ये 49 धावा देऊन केवळ 1 विकेट काढली. अक्षर पटेलने 19 धावा दिल्या. त्यामुळे टीम इंडियाला याचा खूप मोठा फटका बसला. आयपीएलमध्ये जबरदस्त कामगिरी करणारे दोन्ही खेळाडू दक्षिण आफ्रिकेसमोर फेल ठरल्याने पंतने नाराजी व्यक्त केली.
भारताला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सलग दुसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला. दिल्लीत झालेल्या पहिल्या सामन्यात आफ्रिकेने भारताचा 7 विकेट्सने पराभव केला होता. आता सीरिज जिंकण्यासाठी भारताला पुढचे 3 सामने जिंकणं महत्त्वाचं आहे.
दोन्ही सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंनी अत्यंत वाईट कामगिरी केली. ऋतुराज गायकवाड दोन्ही सामन्यात फ्लॉप दिसला. त्याच्यामुळे भारतीय संघाला चांगली सुरुवात करता आली नाही आणि टीम इंडियाला पराभवाला सामोरे जावे लागले. याशिवाय पंतही विशेष कामगिरी करताना दिसला नाही.