मुंबई: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसरा वन डे सामना आज होत आहे. पहिला वन डे सामना गमवल्यानंतर आज टीम इंडियाला हा सामना जिंकणं महत्त्वचं आहे. त्यामुळे टीम इंडियासाठी करो या मरोची लढाई असणार आहे. टीम इंडियाने पहिला वन डे सामना 31 धावांनी गमवला आहे. दुसऱ्या वन डेसाठी टॉस झाला आहे.
टीम इंडियाने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. टीम इंडियाचे प्लेइंग इलेव्ह देखील जाहीर करण्यात आलं आहे. दुसऱ्या वन डे सामन्यासाठी संघात कोणताही बदल करण्यात आला नाही.
टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन-
शिखर धवन, के एल राहुल (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर) श्रेयस अय्यर, व्यंकटेश अय्यर, शार्दुल ठाकूर, रविचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, युजवेंद्र चहल
आजचा सामना गमवला तर कसोटी प्रमाणे टीम इंडियाच्या हातून वन डे सीरिजही जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे टीम इंडियाला या सामन्यात नव्याने स्ट्रॅटजी प्लॅन करावी लागणार आहे. टीम इंडियाने पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
दुसऱ्या सामन्यात पूर्ण जोर लावून सामना जिंकण्याचा मानस टीम इंडियाचा असणार आहे. तर केएल राहुलच्या नेतृत्वात खेळणाऱ्या टीम इंडियाला पराभूत करुन मालिका जिंकण्याचा प्रयत्न यजमान आफ्रिकेचा असेल.
दक्षिण आफ्रिका प्लेइंग इलेव्हन -
क्विंटन डी कॉक, जे. मालन, एडन मार्कराम, आर. व्ही. डुसेन, टेंबा बावुमा (कर्णधार), डेव्हिड मिलर, ए. फेलियुक्वाओ, मार्को जेन्सन, केशव महाराज, टी. शम्सी, लुंगी एनगिडी.
2ND ODI. India win the toss and elect to bat. https://t.co/cHNYBVneZ8 #SAvIND
— BCCI (@BCCI) January 21, 2022