मुंबई : भारताविरुद्धच्या टी-२० आणि टेस्ट सीरिजसाठी दक्षिण आफ्रिकेने त्यांच्या टीमची घोषणा केली आहे. टी-२० सीरिजसाठी क्विंटन डिकॉकला कर्णधार बनवण्यात आलं आहे. तर टेस्ट टीमसाठी फॅफ डुप्लेसिसकडे कर्णधारपद कायम आहे. पण दक्षिण आफ्रिकेच्या टीममध्ये फास्ट बॉलर डेल स्टेनची निवड करण्यात आलेली नाही. यामुळे डेल स्टेन नाराज झाला आहे. स्टेननं नुकतीच टेस्ट क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.
'भारत दौऱ्यासाठी आपण उपलब्ध नसल्याचं क्रिस मॉरिसने सांगितलं, असं दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने टीम निवडीची घोषणा करताना सांगितलं,' असं ट्विट दक्षिण आफ्रिकेच्या एका क्रिकेट रसिकाने केलं. यावर स्टेनने प्रतिक्रिया दिली. 'मी भारत दौऱ्यासाठी उपलब्ध होतो, पण कोचिंग स्टाफ बदलल्यामुळे त्यांच्याकडून माझा नंबर हरवला असेल,' असा निशाणा स्टेनने साधला.
I did... Obviously lost my number in the reshuffling of coaching staff.
— Dale Steyn (@DaleSteyn62) August 13, 2019
स्टेनच्या या उत्तराला या क्रिकेट चाहत्यानं पुन्हा एकदा प्रतिक्रिया दिली. 'नवीन निवड समितीने तुला मोठ्या सामन्यांसाठी राखून ठेवलं असेल. (नवीन निवड समितीत आहे कोण?)' असं या यूजरने विचारलं. तेव्हा स्टेन म्हणाला, 'भारताविरुद्धचा सामना मोठा वाटत नसेल, तर मी विराट आणि कोट्यवधी लोकांची माफी मागतो'.
Apologies to Virat and a billion people for thinking they not
— Dale Steyn (@DaleSteyn62) August 13, 2019
फॅफ डुप्लेसिस (कर्णधार), टेम्बा बवुमा, थियुनिस डि ब्रुयुन, क्विंटन डिकॉक, डीन एल्गार, जुबैर हमजा, केशव महाराज, एडन मार्करम, सेनुरैन मुथुस्वामी, लुंगी एनगिडी, एनरिच नोर्टजे, वर्नन फिलेंडर, डेन पिड्ट, कगिसो रबाडा, रुडी सेकंड
क्विंटन डिकॉक (कर्णधार), रस्सी व्हॅन डर ड्यूसेन, टेंबा बवुमा, ज्युनियर डाला, बोर्न फोर्टुइन, ब्युरन हेंड्रिक्स, रीझा हेंड्रिक्स, डेव्हिड मिलर, एनरिच नॉर्टजे, अॅन्डिले फेहुकुयो, ड्वेन प्रीटोरियस, कगिसो रबाडा, जॉन-जॉन स्मट्स, तबरेज शम्सी