IND vs SA 3rd Test | बुमराहचा 'पंच', दक्षिण आफ्रिका 210 धावांवर ऑल आऊट

 टीम इंडियाच्या गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर (IND vs SA 3rd Test) दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 210 धावांवर आटोपला आहे.  

Updated: Jan 12, 2022, 08:37 PM IST
IND vs SA 3rd Test | बुमराहचा 'पंच', दक्षिण आफ्रिका 210 धावांवर ऑल आऊट title=

केपटाऊन : टीम इंडियाच्या गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर (IND vs SA 3rd Test) दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 210 धावांवर आटोपला आहे. टीम इंडियाच्या (Team India) गोलंदाजांसमोर आफ्रिकेच्या फलंदाजांनी शरणागती पत्कारली. टीम इंडियाकडून 'यॉर्कर किंग' जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. आफ्रिकेकडून कीगन पीटरसनने सर्वाधिक 72 धावांची खेळी केली. तर  टेम्बा बावुमाने 28 धावा केल्या. टीम इंडियाने पहिल्या डावात 223 धावा केल्या. त्यामुळे टीम इंडियाला दुसऱ्या डावात 13 धावांची नाममात्र आघाडी मिळाली. (ind vs sa 3rd test day 2 south africa all out on 210 runs in 1st innings team india 13 runs leads at newlands cape town)

बुमराहचा पंच

जसप्रीत बुमराहने आफ्रिकेच्या 5 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. बुमराहने डीन एल्गर, एडन मार्करम, कीगन पीटरसन, मार्को जॅनसेन आणि लुंगी एनगिडी या 5 जणांना आऊट केलं. बुमरागने 23.3 ओव्हरमध्ये 42 धावा देत या 5 विकेट्स घेतल्या. बुमराह व्यतिरिक्त उमेश यादव आणि मोहम्मद शमी या दोघांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तर शार्दुल ठाकूरने 1 कगिसो रबाडाचा काटा काढला. 

दक्षिण आफ्रिका | डीन एल्गर (कर्णधार), एडन मार्करम, कीगन पीटरसन, रॅसी व्हॅन डर ड्युसेन, टेम्बा बावुमा, काइल वेरेन (विकेटकीपर), मार्को जॅनसेन, कागिसो रबाडा, केशव महाराज, डुआन ऑलिव्हियर आणि लुंगी एनगिडी. 

टीम इंडिया : केएल राहुल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कॅप्टन), अजिंक्य रहाणे, रिषभ पंत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि उमेश यादव.