T20 World Cup : टीम इंडियाला झालंय काय? आणखी एक स्टाईक बॉलर संघातून 'आऊट'

T20 World Cup पूर्वी टीम इंडियाचा आणखी एक स्टाईक बॉलर संघातून बाहेर

Updated: Oct 4, 2022, 08:26 PM IST
T20 World Cup : टीम इंडियाला झालंय काय? आणखी एक स्टाईक बॉलर संघातून 'आऊट' title=

IND vs SA 3rd T20 : आगामी टी-ट्वेंटी वर्ल्डकपपूर्वी भारताला मोठे धक्के बसल्याचं पहायला मिळत आहे. आगामी वर्ल्डकपपूर्वी आधी टीम इंडियाची लिटमस टेस्ट पार पडत आहे. भारत आणि साऊथ अफ्रिकेमध्ये खेळल्या (IND vs SA 3rd T20) जाणाऱ्या टी-ट्वेंटी मालिकेत भारतीय खेळाडू जबरदस्त कामगिरी करत आहे. आधीच भारताचा स्टार गोलंदाज बुमराह वर्ल्डकपमधून बाहेर पडलाय. त्यानंतर आता भारताचा आणखी एक स्टाईक बॉलर जखमी असल्याने रोहित शर्माचं (Rohit Sharma) टेन्शन वाढलंय. (India's strike bowler Arshdeep Singh injured cricket marathi news)

जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) जखमी असल्याने भारतीय गोलंदाजी कमकूवत झाली आहे. तर रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) देखील संघाबाहेर असणार आहे, त्यामुळे भारतीय गोलंदाजांची कसोटी  लागणार आहे. अशातच टीम इंडियाला धक्क्यावर धक्के बसत आहेत. भारताचा स्टाईक बॉलर अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) दुखापतग्रस्त असल्याची माहिती समोर आली आहे.

भारत आणि दक्षिण अफ्रिकेमध्ये खेळल्या जात असलेल्या तिसऱ्या सामन्यात अर्शदीप सिंग शारिरीकदृष्ट्या फिट (Arshdeep Singh Fitness) नसल्याने मैदानात उतरला नाही. अर्शदीपला पाठीची समस्या असल्याची माहिती आता समोर आली आहे. पाठीची समस्या किती गंभीर आहे, त्याबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही. त्यामुळे आता टीम इंडिया वर्ल्डकप (T20 World Cup) जिंकणार तरी कसं?, असा सवाल उपस्थित केला जातोय.

Team India बद्दल मोठी भविष्यवाणी, 'हा' खेळाडू एकहाती T20 World Cup जिंकून देणार!

दरम्यान, पाठीची समस्या गंभीर नसेल तर अर्शदीप वर्ल्डकपमध्ये कमाल दाखवू शकतो.ऑस्ट्रेलियाच्या पिचवर अर्शदीप टीम इंडियाला विजयाच्या उंभरट्यावर पोहचवू शकतो. बुमराह, जडेजा त्याचबरोबर दीपक हुड्डाच्या (Deepak Hooda) यादीत अर्शदीपचं नाव येऊ नये, यासाठी संघाचे डॉक्टर पुर्ण प्रयत्न करत आहेत.