T20 World Cup: भारत-पाकिस्तान सामन्यावर महासंकट? क्रिकेट फॅन्सची होणार निराशा

भारत-पाकिस्तान सामन्यावर नेमकं कोणत संकट ओढवणार आहे? सामना रद्द होण्याची शक्यता?

Updated: Oct 17, 2022, 07:35 PM IST
T20 World Cup: भारत-पाकिस्तान सामन्यावर महासंकट? क्रिकेट फॅन्सची होणार निराशा title=

पर्थ : टी20 वर्ल्ड कपला (T20 World Cup) आजपासून सुरूवात झाली आहे. टीम इंडियासह (Team India) इतर प्रतिस्पर्धी संघाच लक्ष या वर्ल्ड कपवर नाव कोरण्यावर असणार आहे. त्यात आता या सामन्यापुर्वीच टीम इंडियावर महासंकट ओढवणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. त्यामुळे हायव्होल्टेज सामन्यापूर्वी क्रिकेट फॅन्सची निराशा होण्याची शक्यता आहे. 

हे ही वाचा : 2,2,W,W,W,W…मोहम्मद शमीची एकच ओव्हर, आणि ऑस्ट्रेलियाचा पराभव 

टी20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) येत्या 23 ऑक्टोंबरला भारत-पाकिस्तान (India Vs Pakistan) यांच्यात हायव्होल्टेज सामना रंगणार आहे. या सामन्याचे तिकीट आधीच बुक झाली आहेत. त्यामुळे क्रिकेट फॅन्ससाठी कधी एकदाचा तो दिवस उजाडतोय असे झाले आहे. त्या दिवशी मेलबर्न ग्राऊंडवर भरगच्च स्टेडीअम, क्रिकेट फॅन्सचा उत्साह, टीम इंडिया किंवा पाकिस्तानला चीअर करणारे आवाज आणि दृष्य डोळ्यासमोर येत आहे. मात्र या सर्व उत्साहावर पाणी फिरण्याची शक्यता असणार आहे. कारण हायव्होल्टेज सामन्यावर मोठ महासंकट ओढवणार आहे. 

हे ही वाचा : Ind vs Aus : किंग कोहलीची सुपर कॅच, VIDEO आला समोर 

कोणत महासंकट असणार आहे?

भारत-पाकिस्तान (India Vs Pakistan) यांच्यात होणाऱ्या हायव्होल्टेज सामन्यावर पावसाचे सावट असणार आहे. 23 ऑ़क्टोबर रोजी मेलबर्नमधल हवामान खराब असण्याची शक्यता आहे. मेलबर्नमध्ये त्या दिवशी पाऊस पडण्याची शक्यता असून पावसामुळे खेळ खराब होण्याची भीती आहे. त्यामुळे सामन्यावर हे मोठ संकट असणार आहे. 

हे ही वाचा : विराट कोहलीसोबत दिसणारी 'ती' मिस्ट्री गर्ल आहे तरी कोण? जाणून घ्या

हवामान खात्याचा अंदाज काय? 

वेदर फोरकास्ट एजन्सीनुसार, 20 ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलियातील 3 राज्य पावसाने प्रभावित होणार आहेत. या बदललेल्या हवामानापासून मेलबर्नही वाचणार नाहीत. 

हवामानासंबंधी माहिती देणाऱ्या वेबसाइट AccuWeather नुसार, 23 ऑक्टोबरच्या सकाळी मेलबर्नमध्ये पाऊस पडू शकतो. त्यानंतर दिवसभर आकाश ढगाळ राहू शकते. तर 22 ऑक्टोबरला, सामन्याच्या एक दिवस आधी, ढगाळ आकाशाव्यतिरिक्त, दुपारनंतर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. याशिवाय दिवसभर पावसाची संततधार पहायला मिळण्याची शक्यता आहेत. 

दरम्यान टी20 वर्ल्ड कपमधला (T20 World Cup) भारत-पाकिस्तान (India Vs Pakistan) यांच्यातला हा हायव्होल्टेज सामना आता पार पडतो की नाही, हे हवामानावर अवलंबून असणार आहे. त्यामुळे जर हा सामना रद्द झाला तर फॅन्सची निराशा होण्याची शक्यता आहे.