'विराट, शमी, श्रेयस नाही तर...'; नासिर हुसैनने सांगितलं Semi Final चा 'खरा हिरो' कोण

IND vs NZ World Cup 2023 This player Is India's Real Hero: भारताने मुंबईतील वानखेडे स्टेडियमममधील न्यूझीलंडविरुद्धचा सेमी-फायलनचा सामना 70 धावांनी जिंकत फायलनमध्ये प्रवेश केला.

स्वप्निल घंगाळे | Updated: Nov 16, 2023, 03:57 PM IST
'विराट, शमी, श्रेयस नाही तर...'; नासिर हुसैनने सांगितलं Semi Final चा 'खरा हिरो' कोण title=
भारताच्या विजयानंतर नोंदवली प्रतिक्रिया

IND vs NZ World Cup 2023 This player Is India's Real Hero: भारतीय संघ वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये पोहोचला आहे. मुंबईमधील वानखेडे स्टेडियममध्ये बुधवारी झालेल्या पहिल्या सेमी-फायलनमध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाने न्यूझीलंडला 70 धावांनी पराभूत केलं. सेमी-फायलनमध्ये विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांनी दमदार शतकं झळकावली. तर गोलंदाजीमध्ये मोहम्मद शमीने भन्नाट गोलंदाजी करत न्यूझीलंडच्या 7 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. शमी हा वनडेमध्ये 7 विकेट्स घेणारा पहिला भारतीय ठरला आहे. शमीला सामनावीर पुरस्कार मिळाला. मात्र इंग्लंडचा माजी कर्णधार आणि विद्यमान समालोचक नासिर हुसैनने विराट, शमी किंवा श्रेयस या विजयाचा खरा हिरो नसल्याचं म्हटलं आहे. या विजयाचा खरा हिरो हा भारतीय कर्णधार रोहित शर्मा असल्याचं नासिर हुसैनने म्हटलं आहे. 

सामन्यात नेमकं काय घडलं?

टॉस जिंकल्यानंतर फलंदाजी करण्याचा भारताचा निर्णय योग्य ठरला. सुरुवातीला रोहित शर्मा आणि शुभमन गिलनं तुफान फलंदाजी करत भारताला चांगली सुरुवात करुन दिली. मात्र रोहित अर्धशतक होण्याआधीच बाद झाला. नंतर फलंदाजीसाठी आलेल्या विराट कोहलीने विक्रमी 50 वं शतक झळकावलं. त्यापाठोपाठ आलेल्या श्रेयस अय्यरने आक्रमक फलंदाजी करत शतक झळकावलं. शुभमन गिल रिटायर हर्ट होऊन मैदानाबाहेर गेला पण सामन्यातील शेवटच्या काही षटकांमध्ये फलंदाजीसाठी आला. या सर्वांच्या खेळीच्या जोरावर भारताने 4 बाद 397 अशी धावसंख्या उभारली. न्यूझीलंडला हे आव्हान पेलवलं नाही आणि 7 चेंडू बाकी असतानाच न्यूझीलंडचा संघ तंबूत परतला. कर्णधार केन विल्यमसन आणि डॅरेल मिचेल यांनी कडवी झुंज दिली.

...तेव्हाच रोहितने सुरु केला बदल

भारत फायलनमध्ये पोहोचल्यानंतर नासिर हुसैन हा इयन मॉर्गन आणि मायकल आथर्टनबरोबर सामन्याचं विश्लेषण करत होता. त्यावेळेस बोलताना त्याने टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारताचा पराभव झाल्यानंतरच रोहित शर्माने बदल करण्यास सुरुवात केली. "उद्या तुम्ही पाहिलं तर विराट कोहली हा बातम्यांच्या मथळ्यांमध्ये असेल. श्रेयस अय्यर हेडलाइन्समध्ये असेल. मोहम्मद शमीही हेडलाइन्समध्ये झळकेल. मात्र भारताचा खरा हिरी आणि भारतीय क्रिकेटची संस्कृती बदलणारा खरा हिरो हा रोहित शर्मा आहे. जेव्हा भारत इंग्लंडविरुद्ध वाईट कामगिरी करुन पराभूत झाल्याने टी-20 वर्ल्ड कपमधून बाहेर पडला होता त्या दिवशी त्याने दिनेश कार्तिकला आम्हाला बदलायला हवं, असं सांगितलेलं," अशी आठवण नासिर हुसैनने सांगितली.

नक्की वाचा >> बुटांसाठी खास स्पेस, जीम, बाल्कनी अन्... मुंबईकर श्रेयस अय्यरचं 12 कोटींचं आलिशान घर पाहिलं का?

पहिल्यांदाच नेतृत्वाची कसोटी

सामन्याचा दबाव असतानाही रोहित शर्माने ड्रेसिंग रुममध्ये खेळाडूंना कसं खेळायचं हे समजावून सांगितल्याचं नासिर हुसैन म्हणाला. "केवळ बोलणं ही एक गोष्ट असते आणि करणं ही पूर्णपणे वेगळी गोष्ट असते. आज माझ्यासाठी रोहित शर्मा खरा हिरो आहे. पहिल्यांदा या स्पर्धेत त्याच्या नेतृत्व गुणांचं कौशल्य आजमावलं गेलं. साखळी फेरी आणि बाद फेरीमध्ये फार फरक असतो. इथंही तो न घाबरता खेळू शकतो का? कर्णधार म्हणून तो मैदानावर आला आणि ड्रेसिंग रुममधील लोकांना त्यांनी दाखवलं की कसं खेळायचं आहे," असं नासिर हुसैन म्हणाला.

वर्ल्ड कप 2023 मध्ये भारताने सलग 10 वा विजय मिळवला आहे. साखळी फेरीतील सर्व सामने भारताने जिंकले. आता सेमी-फायनल जिंकून भारत 19 नोव्हेंबर रोजी वर्ल्ड कपची फायलन खेळणार आहे.