रांची: भारत विरुद्ध न्यूझीलंड आज दुसरा सामना रांची इथे खेळला जाणार आहे. संध्याकाळी 6.30 वाजता टॉस होणार आहे. तर 7 वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. न्यूझीलंड विरुद्ध टी 20 सीरिजमधील दुसऱ्या सामन्यात आता एक मोठा बदल होऊ शकतो.
पहिल्या टी 20 सामन्यात किवी संघाला सर्वाधिक धावा देणाऱ्या दीपक चाहरचा पत्ता कट होण्य़ाची शक्यता आहे. रोहित शर्मा दीपक ऐवजी हर्षल पटेलला संधी देण्याची शक्यता आहे. दीपक चाहरने पहिल्या टी 20 सामन्यात किवी संघाला सर्वात जास्त धावा दिल्या होत्या. त्याची कामगिरी चांगली राहिली नाही.
दीपक चाहरने 42 धावा देऊन केवळ एकच विकेट घेतली. टीम इंडियाने न्यूझीलंडने दिलेलं 165 धावांचं लक्ष्य पूर्ण केलं. या विजयामध्ये सूर्यकुमार आणि रोहित शर्माचा मोठा वाटा आहे. दीपक चाहर ऐवजी हर्षल पटेलला डेब्यू करण्याची संधी मिळू शकते. व्यंकटेश अय्यर पाठोपाठ आता हर्षल पटेलही प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्यासाठी उतरू शकतो.
टीम इंडिया संभाव्य प्लेइंग इलेव्हन
रोहित शर्मा (कर्णधार), के एल राहुल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (विकेटकीपर), श्रेयस अय्यर, व्यंकटेश अय्यर, अक्षर पटेल, आर अश्विन, हर्षल पटेल , भुवनेश्वर कुमार, मोहम्मद सिराज
टीम इंडियाचं शेड्युल
रांची दुसरी टी 20 आंतरराष्ट्रीय सामना - 19 नोव्हेंबर 2021
तिसरा टी 20 आंतरराष्ट्रीय सामना- 21 नोव्हेंबर 2021
पहिला कसोटी सामना- 25-29 नोव्हेंबर 2021 - कानपूर
दुसरा कसोटी सामना- 3-7 डिसेंबर 2021- मुंबई