मांजरेकरकडून विराटची तुलना इम्रान खानशी

न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० सीरिजमध्ये भारताचा ५-०ने विजय झाला आहे. 

Updated: Feb 3, 2020, 07:41 PM IST
मांजरेकरकडून विराटची तुलना इम्रान खानशी title=

मुंबई : न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० सीरिजमध्ये भारताचा ५-०ने विजय झाला आहे. टी-२० सीरिज ५-०च्या अंतराने जिंकणारी भारतीय टीम ही जगातली पहिलीच ठरली आहे. तसंच न्यूझीलंडमध्ये भारताने पहिल्यांदाच टी-२० सीरिज जिंकण्याचा विक्रमही केला आहे. टीम इंडियाच्या या दणदणीत कामगिरीनंतर क्रिकेट समालोचक आणि माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी कर्णधार विराट कोहलीची तुलना पाकिस्तानचे पंतप्रधान आणि माजी कर्णधार इम्रान खान यांच्याशी केली आहे. 

'टीम इंडिया आणि विराट कोहलीने मला इम्रान खानच्या पाकिस्तानी टीमची आठवण करुन दिली. एक टीम म्हणून स्वत:वर विश्वास. इम्रान खानच्या पाकिस्तानी टीमने खासकरुन हरणाऱ्या मॅच जिंकण्याच्या वेगवेगळ्या पद्धती शोधून काढल्या होत्या. जेव्हा तुमचा स्वत:वर विश्वास असतो, तेव्हाच तुम्ही हे करु शकता,' असं मांजरेकर त्यांच्या ट्विटमध्ये म्हणाले. 

न्यूझीलंडला व्हाईट वॉश केल्यानंतर विराट कोहलीनेही आनंद व्यक्त केला आहे. 'ज्या पद्धतीने आम्ही कामगिरी केली, ती बघून अभिमान वाटला. विजयासाठी प्रत्येकवेळी वेगवेगळ्या पद्धती शोधून काढण्याबाबत आम्ही टीम म्हणून चर्चा केली. जेव्हा ही चर्चा विजयात परावर्तित होते, तेव्हा चांगलं वाटतं,' अशी प्रतिक्रिया विराटने मॅच संपल्यानंतर दिली. 

न्यूझीलंडविरुद्धच्या या सीरिजच्या पहिल्या दोन्ही मॅच जिंकल्यानंतर पुढच्या दोन्ही मॅचचा निकाल सुपर ओव्हरमध्ये लागला. तर पाचवी मॅच भारताने ७ रनने जिंकली. चौथ्या मॅचसाठी रोहित शर्माला तर पाचव्या मॅचसाठी विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली होती. पाचव्या मॅचमध्ये रोहित शर्मा टीमचा कर्णधार होता, पण बॅटिंग करत असताना पायाला दुखापत झाल्यामुळे तो पुढची मॅच खेळू शकला नाही. रोहितच्या अनुपस्थितीमध्ये केएल राहुलने भारताचं नेतृत्व केलं.  

टॉप हेडलाईन्स

भरचौकात शिक्षिकेला जाळलं, घटनेविरोधात विद्यार्थिनींचा आक्रोश

कोरोना व्हायरसची ज्याला लागण झाली त्याचा मृत्यू अटळ?

लक्ष्मीकांत बेर्डे यांचा अफलातून अभिनय,विनोदाचं टायमिंग एकदा पाहाच....

लोणीकरांनी 'हिरॉईन' उल्लेख केलेल्या महिला तहसीलदार सुट्टीवर

कुणाल कामरा राज ठाकरेंच्या भेटीसाठी कृष्णकुंजवर