ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवाचा बदला न्यूझीलंड भारताविरुद्ध घेणार

ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा तिसऱ्या टेस्ट मॅचमध्ये २७९ रननी पराभव केला.

Updated: Jan 7, 2020, 12:25 PM IST
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवाचा बदला न्यूझीलंड भारताविरुद्ध घेणार title=

सिडनी : ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा तिसऱ्या टेस्ट मॅचमध्ये २७९ रननी पराभव केला. याचसोबत ऑस्ट्रेलियाने ३ टेस्ट मॅचची सीरिज ३-०ने आपल्या नावावर केली. हा दौरा संपल्यानंतर आता ऑस्ट्रेलियाची टीम भारत दौऱ्यावर येणार आहे. भारत दौऱ्यात ऑस्ट्रेलियाची टीम ३ वनडे मॅचची सीरिज खेळणार आहे. या सीरिजनंतर भारत न्यूझीलंडच्या दौऱ्यावर जाणार आहे.

न्यूझीलंडच्या टीमला ऑस्ट्रेलिया दौऱ्यात मोठ्या पराभवांना सामोरं जावं लागलं. न्यूझीलंडने तिन्ही मॅच २०० पेक्षा जास्त रननी गमावल्या. या सीरिजमध्ये न्यूझीलंडला दुखापतींनीही ग्रासलं होतं. कर्णधार केन विलियमसन, लॉकी फर्ग्यूसन, ट्रेन्ट बोल्ट आणि हेन्री निकोल्स यांना दुखापत झाली, त्यामुळे तिसऱ्या टेस्टमध्ये टॉल लेथम न्यूझीलंडचा कर्णधार होता.

तिसऱ्या टेस्टमध्ये पराभव झाल्यानंतर टॉम लेथम म्हणाला, 'आम्ही ऑस्ट्रेलियात मोठ्या आशेने आलो होतो, पण आम्ही खराब खेळलो. बॅटिंगमध्ये आम्ही निराशाजनक कामगिरी केली. पण ही आरोप-प्रत्यारोप करण्याची वेळ नाही. आता आमचा मुकाबला भारतीय टीमशी आहे. ही सीरिज आमच्या घरात होणार आहे. त्यामुळे आम्ही नक्कीच चांगली कामगिरी करु.'

न्यूझीलंड दौऱ्यामध्ये भारत ५ टी-२० मॅच, ३ वनडे आणि २ टेस्ट मॅचची सीरिज खेळणार आहे. २४ जानेवारीपासून या सीरिजला सुरुवात होईल. २०१९ वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडने भारताचा पराभव केला होता. या पराभवानंतर भारत आणि न्यूझीलंड पहिल्यांदाच समोरासमोर येणार आहेत.