IND vs NZ : टेलर-लॉथमची शतकीय खेळी, न्यूझीलंडचा साराव सामन्यात विजय

  न्यूझीलंड क्रिकेट टीमने गुरूवारी खेळण्यात आलेल्या दुसऱ्या सराव सामन्यात भारतीय बोर्ड अध्यक्ष संघाला ३३ धावांनी पराभूत केले. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Oct 19, 2017, 08:55 PM IST
IND vs NZ :  टेलर-लॉथमची शतकीय खेळी, न्यूझीलंडचा साराव सामन्यात विजय  title=

मुंबई :  न्यूझीलंड क्रिकेट टीमने गुरूवारी खेळण्यात आलेल्या दुसऱ्या सराव सामन्यात भारतीय बोर्ड अध्यक्ष संघाला ३३ धावांनी पराभूत केले. 

ब्रेबॉर्न स्टेडिअमवर खेळविण्यात आलेल्या सामन्यात न्यूझीलंडने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

त्यानंतर अध्यक्षीय संघासमोर त्यांनी ३४४ धावांचे आव्हान ठेवले. या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय अध्यक्षीय संघ ३१० धावांमध्ये बाद झाला. 

न्यूझीलंडकडून रॉस टेलर (१०२) आणि टीम लॉथम (१०८) धावांची शतकीय खेळी केली. या खेळींमुळे नऊ विकेट गमावून न्यूझीलंडने ५० षटकात ३४३ धावा केल्या. 

लॉथम आणि टेलर शिवाय कोणताही खेळाडून जास्त काळ टिकू शकला नाही. दोन फलंदाज रिटायर्ड हर्ट होऊन पॅव्हेलियनमध्ये परतले.  अध्यक्षीय संघाकडून जयदेव उनाटकट याने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. त्याशिवाय कर्ण शर्मा याने दोन विकेट घेतल्या. 

लक्ष्यचा पाठलाग करताना करूण नायर याने (५३) धावांची अर्धशतकीय खेळी केलीय. नायर बाद झाल्यानंतर लागोपाठ विकेट पत गेले २३१ धावांवर भारताने ८ विकेट गमावल्या. त्यानंतर गुरूकिरत सिंह (६५) आणि उनाटकट याने (४४) धावांची खेळी करून न्यूझीलंडला कडवे आव्हान दिले. पण ३१० धावांमध्ये संपूर्म संघ गारद झाला. 

न्यूझीलंडकडून मिचेल सेँटनर याने एकूण तीन विकेट घेतले, तर कोलिन मुनरो आणि टीम साऊदीने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. बाऊल्ट आणि मॅट हेन्री आणि ईश सोढी याने प्रत्येकी एक-एक विकेट घेतल्या.