दुबई: टीम इंडियासाठी आजचा दिवस करो या मरोसारखा आहे. न्यूझीलंड विरुद्धचा सामना जिंकण्यासाठी टीम इंडियावर मोठा ताण असणार आहे. पाकिस्तान विरुद्धचा 10 विकेट्सने पराभूत झाल्यानंतर आता टीम इंडिया जर आजचा सामना जिंकण्यात अपयशी ठरले तर टीम इंडियासाठी टी 20 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलचे दरवाजे बंद होऊ शकतात.
पाकिस्तान संघ सलग तीन सामने जिंकले आहे. तर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया दोन्ही संघ मजबूत आहेत. त्यामुळे या तीन टीममध्ये मोठी चुरस आहे. दुसरीकडे टीम इंडिया पॉइंट टेबलमध्ये खाली आहे. इतकच नाही तर रनरेटही उणे आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी सुधारण्यासाठी आजचा सामना जिंकणं गरजेचं आहे.
न्यूझीलंड संघातील दोन खेळाडू जखमी झाले होते. मात्र त्यातील एक खेळाडू बरा झाला असून तो मैदानात परतणार असल्याची माहिती मिळाली आहे. धडाकेबाज फलंदाज मार्टिन गुप्टिल मैदानात उतरणार असल्याने आता किवीसाठी ही आनंदाची बातमी आहे. मात्र टीम इंडियाची चिंता वाढली आहे. मार्टिन गुप्टिलला धावा काढू न देता तंबुत धाडण्याचं मोठं आव्हान फलंदाजांसमोर असणार आहे.
मार्टिन गुप्टिल याच्या बोटाला दुखापत झाली होती. आता तो या दुखापतीतून बरा झाला असून आज मैदानात खेळण्यासाठी उतरणार असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे टीम इंडियाचं टेन्शन वाढलं आहे. मार्टिन गुप्टिल मैदानात उतरणार असल्याने किवी संघाला दिलासा मिळाला आहे. टीम इंडियासाठी भुवी किंवा हार्दिक पांड्यामुळे गेल्या वेळी टीम इंडियाला नुकसान झाल्याचा दावा दिग्गज क्रिकेटर्सनी केला होता.