IND vs NZ : भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यामध्ये तीन वनडे सामन्यांची सीरिज खेळवली जातेय. यामधील दुसरा सामना आज, शनिवारी रायपूरमध्ये खेळवला जातोय. शहीद वीर नारायण सिंह क्रिकेट स्टेडियममध्ये हा सामना खेळवला जात असून टीम इंडियाने प्रथम गोलंदाजी करत न्यूझीलंडच्या फलंदाजांची दाणादाण उडवली. अवघ्या 34.3 ओव्हरमध्ये टीम इंडियाने न्यूझीलंडचा ऑल आऊट केला. दुसरी वनडे जिंकण्यासाठी भारताला 109 रन्सचं लक्ष्य देण्यात आलंय.
न्यूझीलंकडून ग्लेन फिलिप्सने सर्वाधिक म्हणजेच 36 रन्सची खेळी केली. गेल्या सामन्यात टीम इंडियासाठी मायकल ब्रेसवेलला देखील मोठी खेळी करता आली नाही. अवघ्या 22 रन्सवर तो माघारी परतला. फिलिप्सनंतर मिचेल सँटरने 27 रन्सची खेळी केली. या तिघांशिवाय कोणालाही दोन आकडी संख्या गाठता आली नाही. किवींचा संपूर्ण टीम 108 रन्सवर ऑल आऊट झाली.
टीम इंडियाकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक म्हणजेच 3 विकेट्स घेतले. तर हार्दिक पंड्या आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी 2-2 विकेट्स घेतल्या आहे. तर मोहम्मद शमी, शार्दुल ठाकूर आणि कुलदीप यादवला प्रत्येकी 1-1 विकेट काढण्यात यश आलं आहे.
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, इशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज
फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे, हेन्री निकोल्स, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (विकेटकीपर/कर्णधार), मायकेल ब्रेसवेल, ग्लेन फिलिप्स, मिशेल सँटनर, ईश सोधी, लॉकी फर्ग्युसन, ब्लेअर टिकनर, जेकब डफी, डग ब्रेसवेल, मार्क चॅपमन, हेन्री शिपले