वनडे सीरिजआधी न्यूझीलंडला धक्का, विलियमसन २ मॅचसाठी बाहेर

टी-२० सीरिजमध्ये ५-०ने पराभवाचा सामना करावा लागलेल्या न्यूझीलंडला आणखी एक धक्का बसला आहे. 

Updated: Feb 4, 2020, 04:42 PM IST
वनडे सीरिजआधी न्यूझीलंडला धक्का, विलियमसन २ मॅचसाठी बाहेर title=

हॅमिल्टन : टी-२० सीरिजमध्ये ५-०ने पराभवाचा सामना करावा लागलेल्या न्यूझीलंडला आणखी एक धक्का बसला आहे. कर्णधार केन विलियमसन वनडे सीरिजच्या पहिल्या २ मॅचमध्ये खेळू शकणार नाही. विलियमसनच्या डाव्या खांद्याला दुखापत झाली आहे. एक्स-रे स्कॅनिंगमध्ये ही दुखापत गंभीर नसल्याचं स्पष्ट झालं आहे, तरी विलियमसन पूर्णपणे फिट झालेला नाही. बुधवार ५ फेब्रुवारीपासून ३ वनडे मॅचच्या सीरिजला सुरुवात होणार आहे.

खांद्याच्या दुखापतीमुळे केन विलियमसन टी-२० सीरिजच्या शेवटच्या २ मॅचही खेळू शकला नव्हता. या दोन टी-२० मध्ये टीम साऊदीला न्यूझीलंडचं नेतृत्व देण्यात आलं होतं. आता वनडे सीरिजच्या पहिल्या २ मॅचमध्ये टॉम लेथम न्यूझीलंडचा कर्णधार असेल. विलियमसनच्याऐवजी मार्क चॅपमॅनला पहिल्या २ वनडेसाठी निवडण्यात आलं आहे.

न्यूझीलंडच्या टीममध्ये अनुभवी ट्रेन्ट बोल्ट, लॉकी फर्ग्युसन आणि मॅट हेन्री दुखापतीमुळे आधीच सीरिज बाहेर आहेत. त्यांच्याऐवजी स्कॉट कुजेगलिन, टीम साऊदी आणि हामीश बेनेट यांना संधी मिळाली आहे. मिचेल सॅन्टनर आणि इश सोदी स्पिनरची भूमिका निभावतील.

न्यूझीलंडप्रमाणेच भारतालाही रोहित शर्माच्या रुपात धक्का लागला. पाचव्या टी-२० मॅचवेळी पायाला दुखापत झाल्यामुळे रोहित वनडे आणि टेस्ट सीरिजमध्ये खेळू शकणार नाही. रोहितच्याऐवजी वनडेमध्ये मयंक अग्रवाल आणि टेस्ट टीममध्ये शुभमन गिलला संधी देण्यात आली आहे. वनडे सीरिजमध्ये पृथ्वी शॉ आणि मयंक अग्रवाल ओपनिंगला येतील. तर राहुल मधल्या फळीत खेळेल आणि विकेट कीपिंग करेल, असं विराटने स्पष्ट केलं आहे.

न्यूझीलंडची वनडे टीम 

टॉम लेथम (कर्णधार), टॉम ब्लेंडल, मार्टिन गप्टील, मार्क चॅम्पमन, रॉस टेलर कॉलिन डि ग्रॅण्डहोम, जीमी निशम, टीम साऊदी, काईल जेमीनसन, स्कॉट कुजेगलिन, हेनरी निकोलस, मिचेल सॅन्टनर, इश सोदी, हामीश बेनेट 

भारताची वनडे टीम

विराट कोहली (कर्णधार), मयंक अग्रवाल, पृथ्वी शॉ, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, ऋषभ पंत (विकेटकीपर), शिवम दुबे, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, रवींद्र जडेजा, नवदीप सैनी, शार्दुल ठाकुर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, केदार जाधव