IND vs NZ 3rd T20I: न्युझीलंड (New Zealand) विरूद्धच्या 3 सामन्यांच्या टी20 मालिकेत पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता तर दुसरा सामना टीम इंडियाने (Team India) 65 धावांनी जिंकला. आता तिसरा सामना उद्या 21 नोव्हेंबर 2022 रोजी खेळवला जाणार आहे. या सामन्यात टीम इंडिया आपला सलामीवीर बदलण्याची शक्यता आहे. टीम इंडियाचा ऋषभ पंत (Rishabh Pant) सध्या ऑऊट ऑफ फॉर्म आहे. त्यामुळे त्याच्या जागी तिसऱ्या टी20 सामन्यात दुसऱ्या खेळाडूला संधी मिळण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा : Virat Kohli ला झालंय तरी काय, MS Dhoni संबंधित विचित्र पोस्ट शेअर, जाणून घ्या प्रकरण?
न्यूझीलंड विरूद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यात ऋषभ पंतचा (Rishabh Pant) संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला होता. त्यामुळे या सामन्यात पंत आणि ईशान किशन सलामीला उतरले होते. पण सलामीला उतरून पंतला काही विशेष कामगिरी करता आली नाही. अवघ्या 46.15 च्या स्ट्राईक रेटने 13 चेंडूत 6 धावा करून पंत पॅव्हेलियनमध्ये परतला होता. त्यामुळे संधी देऊन सुद्धा पंत अपयशी ठरत असल्याने आता पुढच्या सामन्यात त्याचा पत्ता कट होण्याची चिन्हे आहेत. त्याच्या जागी आता शुभमन गिलचा (Shubman Gill) संघात समावेश केला जाऊ शकतो.
तिसऱ्या टी20 सामन्यात ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) जागी शुभमन गिलचा (Shubman Gill) संघात समावेश केला जाऊ शकतो. त्यामुळे शुभमन गिल टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करू शकतो. गिलने आतापर्यंत भारताकडून कसोटी क्रिकेट आणि एकदिवसीय सामनेच खेळले आहेत. गिलने अनेक वेळा भारतीय संघासाठी सलामी दिली आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये तो सलामीवीर म्हणून खेळताना दिसतो. आता टी20 क्रिकेटमध्येही तो सलामीलाही उतरताना पाहायला मिळणार आहे.
एकदिवसीय क्रिकेटमध्ये खेळताना गिलने (Shubman Gill) 12 सामन्यात 57.90 च्या सरासरीने 579 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने एक शतक आणि तीन अर्धशतकेही झळकावली आहेत.आयपीएल 2022 मध्ये, त्याने 16 सामन्यांमध्ये 34.50 च्या सरासरीने आणि 132.33 च्या स्ट्राइक रेटने 483 धावा केल्या. अशा परिस्थितीत त्याचे T20 आंतरराष्ट्रीय पदार्पण शक्य दिसत आहे.
ऋषभ पंतची (Rishabh Pant) टी20 आंतरराष्ट्रीय कारकिर्द खुप अशी कमालीची राहिली नाहीए. पंतने त्याच्या शेवटच्या चार T20 आंतरराष्ट्रीय डावात केवळ 42 धावा केल्या आहेत. यामध्ये आफ्रिकेविरुद्ध 27, झिम्बाब्वेविरुद्ध 3, इंग्लंडविरुद्ध 6 आणि न्यूझीलंडविरुद्ध 6 सामन्यांचा समावेश आहे. पंतने आतापर्यंत एकूण 65 T20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 22.69 च्या सरासरीने आणि 125.77 च्या स्ट्राइक रेटने 976 धावा केल्या आहेत.
दरम्यान ऋषभ पंतचा (Rishabh Pant) हा आऊट ऑफ फॉर्म पाहता आता शुभमन गिलला (Shubman Gill) न्युझीलंड विरूद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यात संधी मिळण्याची शक्यता आहे.