IND vs NZ 3rd ODI: हिटमॅनचा 'हा' मोठा रेकॉर्ड मोडण्यासाठी सुर्या सज्ज!

Suryakumar Yadav:  सुर्याची बॅट तळपली तर सुर्या विशेष विक्रम नावावर करू शकतो आणि रोहित शर्माला (Rohit Sharma) मागे टाकू शकतो.

Updated: Nov 29, 2022, 11:37 PM IST
IND vs NZ 3rd ODI: हिटमॅनचा 'हा' मोठा रेकॉर्ड मोडण्यासाठी सुर्या सज्ज! title=
Suryakumar Yadav,Rohit Sharma

India vs New Zealand, 3rd ODI: सध्या सुरू असलेल्या भारत आणि न्यूझीलंड वनडे मालिकेत न्यूझीलंड 1-0 ने आघाडीवर आहे. दुसरा सामना पावसाने वाहून गेल्यानंतर तिसरा सामना जिंकून मालिका बरोबरीने सोडवण्याचा प्रयत्न टीम इंडियाचा असणार आहे. सुर्यकुमार यादवची टी-ट्वेंटी मालिकेत (Suryakumar Yadav) एकाही खेळी (IND vs NZ 2nd T20I) करून अनेकांच्या डोळ्याचे पारणं फिटणं. सुर्यकुमारने नॉट आऊट शतक (Suryakumar Yadav Century) ठोकलं होतं. त्यावेळी सुर्याने षटकारांचा पाऊस देखील पाडला.

सूर्यकुमार यादव सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. सुर्याच्या बॅटमधून विक्रम उभे राहत आहेत. भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात तिसरा एकदिवसीय सामना खेळायचा जाणार आहे. या सामन्यात सुर्याच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असणार आहे. या सामन्यात सुर्याची बॅट तळपली तर सुर्या विशेष विक्रम नावावर करू शकतो आणि रोहित शर्माला (Rohit Sharma) मागे टाकू शकतो.

सध्या चालू असलेल्या कॅलेंडर वर्षात तिन्ही फॉरमॅटमध्ये सर्वाधिक षटकार खेचण्याचा विक्रम रोहित शर्माच्या नावावर आहे. 2019 मध्ये रोहित शर्माने 78 सिक्स खेचले होते. सूर्यकुमार रोहित हा विक्रम मोडण्यासाठी (Most sixes in year) फक्त पाच सिक्सने मागे आहे. सुर्याने या वर्षात 74 सिक्स मारलेत आणि ज्या पद्धतीने तो फलंदाजी करतोय. एका सामन्यात पाच षटकार मारणं ही सुर्यासाठी मोठी गोष्ट नाही.

आणखी वाचा - Wasim Akram यांची आत्मकथा चर्चेत, बड्या खेळाडूबाबत केला धक्कादायक खुलासा!

दरम्यान, सुर्याने रोहितचा रेकॉर्ड (Suryakumar Yadav Record) मोडला तर टीम इंडियाला एक बडा खेळाडू मिळाला, अशी चर्चा तर होणारच पण सुर्याचं टीममधील नियमित स्थान पक्क होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता उद्याच्या सामन्याची सर्वजण आतुरतेना वाट पाहत आहे. यंदा T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सूर्यकुमारच्या नावावर आहे. सुर्याने 2022 मध्ये 30 सामन्यांमध्ये 1151 धावा केल्या आहेत.