बुमराहची सगळ्यात खराब कामगिरी, नकोशा रेकॉर्डची नोंद

न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडे मॅचमध्येही भारताचा पराभव झाला.

Updated: Feb 8, 2020, 06:56 PM IST
बुमराहची सगळ्यात खराब कामगिरी, नकोशा रेकॉर्डची नोंद title=

ऑकलंड : न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडे मॅचमध्येही भारताचा पराभव झाला. या पराभवासोबतच भारताने ही वनडे सीरिज २-०ने गमावली आहे. भारताचा फास्ट बॉलर जसप्रीत बुमराहसाठी दुखापतीतून केलेलं पुनरागमन फारसं चांगलं ठरलेलं नाही. जानेवारी महिन्यापासून खेळलेल्या ५ वनडे मॅचमध्ये बुमराहला फक्त १ विकेट घेता आली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या या वनडे सीरिजच्या दोन्ही मॅचमध्ये बुमराहला एकही विकेट मिळाली नाही.

न्यूझीलंड दौऱ्यामध्ये जसप्रीत बुमराहची कामगिरी निराशाजनक झाली आहे. दुसऱ्या वनडेमध्ये बुमराहने १० ओव्हरमध्ये ६४ रन दिले. लागोपाठ ३ वनडे मॅचमध्ये बुमराहला एकही विकेट मिळाली नाही. बुमराहला ४ वर्षांच्या कारकिर्दीमध्ये पहिल्यांदाच लागोपाठ ३ मॅचमध्ये एकही विकेट घेता आली नाही.

२६ वर्षांचा जसप्रीत बुमराह वर्ल्ड कपनंतर दुखापत झाल्यामुळे टीमबाहेर होता. यावर्षी जानेवारी महिन्यात बुमराहने क्रिकेटमध्ये पुनरागमन केलं. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ३ वनडे मॅचच्या सीरिजमध्ये बुमराहला एकच विकेट घेता आली. राजकोट वनडेमध्ये विराटला एकमेव यश मिळालं. यानंतर बुमराहने ३ वनडे मॅचच्या ३० ओव्हरमध्ये १५५ रन देऊन एकही विकेट घेतली नाही.

जसप्रीत बुमराहला विकेट मिळाली नसली तरी त्याने रन मात्र कमी दिल्या आहेत. वनडे क्रिकेटमध्ये रन देण्यापेक्षा विकेट घेणं जास्त महत्त्वाचं असतं. त्यामुळे बुमराहला विकेट न मिळणं, हे भारताच्या वनडे सीरिजमधल्या खराब कामगिरीचं कारण असू शकतं.

बुमराहची मागच्या ५ मॅचमधली कामगिरी

विरुद्ध ओव्हर मेडन रन विकेट तारीख
न्यूझीलंड १० ६४ ८ फेब्रुवारी २०२०
न्यूझीलंड १० ५३ ५ फेब्रुवारी २०२०
ऑस्ट्रेलिया १० ३८ १९ जानेवारी २०२०
ऑस्ट्रेलिया ९.१ ३२ १७ जानेवारी २०२०
ऑस्ट्रेलिया ५० १४ जानेवारी २०२०