IND vs NED T20 World Cup : रोहित, विराट, सुर्यकुमारची अर्धशतकी खेळी, नेदरलँडसमोर इतक्या धावांचे लक्ष्य

टीम इंडियाचे नेदरलँडसमोर इतक्या धावांचे लक्ष्य 

Updated: Oct 27, 2022, 05:35 PM IST
IND vs NED T20 World Cup : रोहित, विराट, सुर्यकुमारची अर्धशतकी खेळी, नेदरलँडसमोर इतक्या धावांचे लक्ष्य  title=

पर्थ : IND vs NED T20 World Cup टी20 वर्ल्ड कपमधील (T20 World Cup) दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाने नेदरलँडविरूद्ध (India vs Netherland)  2 विकेट गमावून 179 धावा ठोकल्या आहेत. रोहित शर्मा, विराट कोहली आणि सुर्यकुमार यादवच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर टीम इंडियाने ही धावसंख्या गाठलीय. त्यामुळे आता (Netherland) नेदरलँडसमोर 180 धावांचे लक्ष्य असणार आहे.नेदरलँडकडून फ्रेड क्लासेन आणि पॉल मिकेरनने प्रत्येकी एक विकेट घेतला आहे. आता नेदरलँड ही धावसंख्या पुर्ण करते की टीम इंडिया टी20 वर्ल्ड कपमध्ये आपला दुसरा विजय नोंदवते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit sharma) टॉस जिंकत बॅटींगचा निर्णय घेतला होता. टीम इंडियाकडून (Team India) सलामीला रोहित शर्मा आणि के एल राहूल उतरले होते. मात्र टीम इंडियाची सुरुवात खराब झाली होती. केएल राहुल (KL Rahul) 9 धावांवर आऊट झाला होता. राहुल बाद होताच विराट मैदानात उतरला होता. 

रोहित आणि विराटने टीम इंडियाचा (Team India)  डाव सावरला होता. एका बाजूने रोहित तुफानी खेळत होता, तर दुसऱ्या बाजूने विराट संयमी खेळ खेळत होता. रोहितने 39 बॉलमध्ये  53 धावा ठोकल्या. या खेळीत त्यांनी 4 फोर आणि 3 सिक्स ठोकले. रोहित आऊट होताच सुर्यकुमार मैदानात उतरला होता.

दरम्यान रोहित पाठोपाठ विराटने अर्धशतक ठोकले. विराटने (virat Kohli) 44 बॉलमध्ये 62 धावा केल्या आहेत. या खेळीत त्याने 3 फोर आणि 2 सिक्स मारले आहेत. विराटनंतर सुर्यकुमारने देखील अर्धशतक झळकावले. सुर्यकुमारने 25 बॉलमध्ये 51 धावा केल्या. या त्याच्या खेळीत त्याने 7 फोर आणि 1 सिक्स मारला आहे. या धावांच्या बळावर टीम इंडियाने 2 विकेट गमावून 179  धावा केल्या आहेत. त्यामुळे नेदरलँडसमोर 180 धावांचे लक्ष्य असणार आहे. आता हे लक्ष पुर्ण करून नेदरलँड जिंकते की टीम इंडिया आपला दुसरा विजय मिळवते का याकडे क्रिकेट फॅन्सचे लक्ष लागेल आहे.