टेस्ट मे बेस्ट! धोनी नाही तर 'या' कर्णधाराने जिंकवून दिले सर्वांधिक सामने

टीम इंडियाचा इंग्लंडविरूद्ध सामन्याचा कर्णधार जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली सध्या कसोटी सामना खेळतेय. 

Updated: Jul 1, 2022, 06:25 PM IST
टेस्ट मे बेस्ट! धोनी नाही तर 'या' कर्णधाराने जिंकवून दिले सर्वांधिक सामने  title=

मुंबई : टीम इंडियाचा इंग्लंडविरूद्ध सामन्याचा कर्णधार जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली सध्या कसोटी सामना खेळतेय. या सामन्यात टीम इंडियाची प्रथम फलंदाजी असून 53 धावांवर 2 विकेट गमावले आहेत. लंच ब्रेक संपला आहे मात्र पावसामुळे सामना सुरु होऊ शकला नाही आहे. दरम्यान टीम इंडियाच्या अनेक खेळाडूंनी कसोटी सामन्याचे नेतृत्व केले. मात्र या खेळाडूने सर्वांधिक सामने जिंकून दिले.  

टेस्ट टीमचं नेतृत्व भारताच्या अनेक खेळाडूंनी केले आहे. यामध्ये सर्वांधिक वेळा विराट कोहलीने टीम इंडियाचे नेतृत्व केले आहे. या विराटच्या नेतृत्वात आतापर्यत 68 सामने खेळले गेले आहेत. या 68 सामन्यापैकी 40 सामन्यात विजय मिळवण्यात विराटच्या नेतृत्वात भारताला यश आले आहे.  तर 17 सामन्यात पराभव झाला आहे. तर 11 सामने अनिर्णित राहिले आहेत. 

विराटनंतर धोनीचे नाव येते. धोनीच्या नेतृत्वाखाली 60 सामने खेळवले गेले आहेत.  यामध्ये 27 सामने जिंकले आहेत, तर 18 सामन्यात पराभव झाला. 15 सामने अनिर्णित राहिले.  

भारतीय कर्णधारांची कसोटीत कामगिरी

विराट कोहली: 68 सामने, 40 विजय, 17 पराभव, 11 अनिर्णित - विजयाची टक्केवारी: 58.82
महेंद्रसिंग धोनी: 60 सामने, 27 जिंकले, 18 हरले, 15 अनिर्णित - विजयाची टक्केवारी: 45
सौरव गांगुली: 49 सामने, 21 जिंकले, 13 हरले, 15 अनिर्णित - विजयाची टक्केवारी: 42.85
मोहम्मद अझरुद्दीन: 47 सामने, 14 जिंकले, 14 हरले, 19 अनिर्णित - विजयाची टक्केवारी: 29.78
सुनील गावस्कर: 47 सामने, 9 विजय, 8 पराभव, 30 अनिर्णित - विजयाची टक्केवारी: 19.14
मन्सूर अली खान पतौडी: 40 सामने, 9 जिंकले, 19 हरले - विजयाची टक्केवारी: 22.50
कपिल देव: 34 सामने, 4 जिंकले, 7 हरले: विजयाची टक्केवारी - 11.76
राहुल द्रविड: 25 सामने, 8 जिंकले, 6 हरले - विजयाची टक्केवारी: 32
सचिन तेंडुलकर: 25 सामने, 4 जिंकले, 9 हरले - विजयाची टक्केवारी: 16
बिशनसिंग बेदी: 22 सामने, 6 जिंकले, 11 हरले - विजयाची टक्केवारी: 27.27
अजित वाडेकर: 16 सामने, 4 जिंकले, 4 हरले - विजयाची टक्केवारी: 25
लाला अमरनाथ: 15 सामने, 2 जिंकले, 6 हरले - विजयाची टक्केवारी: 13.33
विजय हजारे: 14 सामने, 1 जिंकला, 5 हरले - विजयाची टक्केवारी: 7.14
अनिल कुंबळे: 14 सामने, 3 जिंकले, 5 हरले - विजयाची टक्केवारी: 21.42
नारी कॉन्ट्रॅक्टर: 12 सामने, 2 जिंकले, 2 हरले - विजयाची टक्केवारी: 16.66
दिलीप वेंगसरकर: 10 सामने, 2 जिंकले, 5 हरले - विजयाची टक्केवारी: 20
पॉली उमरीगर: 8 सामने, 2 जिंकले, 2 हरले - विजयाची टक्केवारी: 25
विनू मंकड: 6 सामने, 0 जिंकले, 1 हरले - विजयाची टक्केवारी - 0
अजिंक्य रहाणे: 6 सामने, 4 जिंकले - विजयाची टक्केवारी: 66.6
गुलाबबाई रामचंद: 5 सामने, 1 जिंकले, 2 हरले - विजयाची टक्केवारी: 20
श्रीनिवास वेंकटराघवन: 5 सामने, 0 जिंकले, 2 हरले - विजयाची टक्केवारी: 0 टक्के
दत्ता गायकवाड: 4 सामने, 0 जिंकले, 4 हरले - विजयाची टक्केवारी: 0
सीके नायडू: 4 सामने, 0 जिंकले, 3 हरले - विजयाची टक्केवारी: 0
वीरेंद्र सेहवाग: 4 सामने, 2 जिंकले, 1 हरला - विजयाची टक्केवारी: 50
कृष्णमाचारी श्रीकांत: ४ सामने, ४ अनिर्णित - विजयाची टक्केवारी: ०
गुलाम अहमद: 3 सामने, 0 जिंकले, 2 हरले - विजयाची टक्केवारी: 0
इफ्तिकार अली पतौडी: 3 सामने, 0 जिंकले, 1 हरले - विजयाची टक्केवारी: 0
विजयनगरमचा महाराजकुमार: 3 सामने, 0 जिंकले, 2 हरले - विजयाची टक्केवारी: 0
गुंडप्पा विश्वनाथ: 2 सामने, 0 जिंकले, 1 हरले - विजयाची टक्केवारी: 0
हेमू अधिकारी: १ सामना अनिर्णीत संपला - विजयाची टक्केवारी: ०
चंदू बोर्डे: एका सामन्यात एक पराभव - विजयाची टक्केवारी: ०
पंकज रॉय: एका सामन्यात एक पराभव - विजयाची टक्केवारी: 0
रवी शास्त्री: 1 सामना जिंकला - विजयाची टक्केवारी: 100
केएल राहुल: एका सामन्यात एक पराभव - विजयाची टक्केवारी: 0
रोहित शर्मा: 2 सामने, 2 जिंकले, 0 हरले - विजयाची टक्केवारी: 100