IND vs ENG : मोहम्मद सिराजची भेदक गोलंदाजी, इंग्लंड 284 धावांवर ऑलआऊट

 इंग्लंडचा पहिला डाव 284 धावावर ऑलआऊट झाला आहे. 

Updated: Jul 3, 2022, 07:46 PM IST
IND vs ENG : मोहम्मद सिराजची भेदक गोलंदाजी, इंग्लंड 284 धावांवर ऑलआऊट  title=

मुंबई : इंग्लंडचा पहिला डाव 284 धावावर ऑलआऊट झाला आहे. जॉनी बेअरस्टोने सर्वाधिक 106 धावा तर  यष्टिरक्षक सॅम बिलिंग्सने 36 धावांची खेळी केली. त्यामुळे इंग्लंडचा संघ 284 धावाचं करू शकला. यामुळे भारताने आता 132 धावांची मोठी आघाडी घेतली आहे. तर टीम इंडियाचा गोलंदाज मोहम्मद सिराजने 4, बुमराह 3, शमी 2 आणि शार्दुलने 1 विकेट घेतली.  

भारताने पहिल्या डावात 416 धावा केल्या होत्या. या धावांच्या प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ पहिल्या डावात केवळ 284 धावाच करू शकला. यामुळे टीम इंडियाला 132 धावांची मोठी आघाडी मिळाली आहे.

इंग्लंडकडून जॉनी बेअरस्टोने सर्वाधिक 106 धावा केल्या. यष्टिरक्षक सॅम बिलिंग्सने 36 धावांची खेळी खेळली. टीम इंडियाला 132 धावांची मोठी आघाडी मिळाली आहे. त्यामुळे दुसऱ्या डावात आता या धावांचा टीम इंडियाला मोठा फायदा होणार आहे.