IND vs ENG: ज्या वयात तरुणांना मजा करायची असते त्या वयात शेफालीने गाठलं यशाचं उत्तुंग शिखर

मूर्ती लहान पण किर्ती महान...पुन्हा एकदा 17 वर्षांच्या शेफालीनं जे केलं ते वाचून कराल कौतुक

Updated: Jun 19, 2021, 01:28 PM IST
IND vs ENG: ज्या वयात तरुणांना मजा करायची असते त्या वयात शेफालीने गाठलं यशाचं उत्तुंग शिखर title=

मुंबई: ज्या वयात अनेकांना मजा आणि एन्जॉय करायचं असतं त्या वयात म्हणजेच अवघ्या 17 व्या वर्षी शेफालीनं उत्तुंग शिखर गाठलं आहे. इंग्लंड विरुद्ध सामन्यातील तिच्या कामगिरीमुळे जगभरात खूप कौतुक होत आहे.

भारतीय महिला टीमनं इंग्लंड महिला टीम विरुद्धच्या टेस्ट मॅचमध्ये शफाली वर्मानं दुसरं अर्धशतक ठोकलं आहे. मॅचच्या पहिल्या डावात फॉलो-ऑनची नामुष्की ओढवली होती. सलामीवीर शफाली वर्मा हिच्या सलग दुसऱ्या अर्धशतकी खेळीमुळे भारतीय महिला संघानं तग धरला. 

इंग्लंडविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्याच्या तिसर्‍या दिवशी शेफली वर्माने हे कामगिरी केली. पहिल्या डावात तिने 96 धावा केल्या मात्र शतक हुकलं तर तिसर्‍या दिवशी चहा ब्रेक होईपर्यंत तिने 55 धावा केल्या आहेत. मर्यादित षटकांच्या क्रिकेटनंतर शेफालीने कसोटीतही आपला उत्कृष्ट फॉर्म कायम ठेवला.

इंग्लंडची लेस्ली कुक त्यानंतर श्रीलंकेची वनीसा बोवेन ऑस्ट्रेलियाची जेफ जॉनसेन यांच्या क्रमवारीत आता शेफालीचं नावही जोडलं गेलं आहे. हा विक्रम करणारी 17 वर्षांची शेफाली चौथ्या स्थानावर पोहोचली आहे.