IND vs ENG 2nd ODI:कोहलीने पांड्याला बॉलिंग का नाकारली ? सांगितलं कारण

 टीम इंडीयाचा कॅप्टन विराट कोहलीने हार्दिक पांड्याला सहावा गोलंदाज म्हणून मैदानात उतरवले नाही

Updated: Mar 27, 2021, 08:08 AM IST
IND vs ENG 2nd ODI:कोहलीने पांड्याला बॉलिंग का नाकारली ? सांगितलं कारण title=

नवी दिल्ली : भारत आणि इंग्लंड(IND vs ENG) यांच्यात झालेल्या दुसर्‍या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाला ((Team India) 6 गडी राखून पराभव पत्करावा लागला. या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडच्या बॅट्समन्ससमोर अक्षरश: लोटांगण घातले. इतकी वाईट स्थिती असताना देखील टीम इंडीयाचा कॅप्टन विराट कोहलीने हार्दिक पांड्याला सहावा बॉलर म्हणून मैदानात उतरवले नाही.

हार्दिकने दुसर्‍या वनडेमध्ये बॉलिंग केली नाही.हार्दिक पंड्या (Hardik Pandya) टी -२० मालिकेत बॉलिंग झाली. पण कोहलीने (Virat Kohli) दुसर्‍या वनडेत त्याला बॉलिंग दिली नाही. कोहली म्हणाला की, पुढील व्यस्त वेळापत्रक पाहता अष्टपैलू खेळाडू फिट ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कोहलीने सांगितले कारण

कोहली म्हणाला, 'आम्हाला त्याची (Hardik Pandya) योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. आम्हाला त्यांची कौशल्ये कोठे आहेत ? हे जाणून घेणे महत्वाचे आहे. टी -२० मध्ये त्याचा गोलंदाजीचा उपयोग झाला होता. पण एकदिवसीय सामन्यात त्याचा कार्यभार व्यवस्थित करणं आवश्यक आहे. आम्हाला इंग्लंडमध्ये कसोटी सामने खेळायचे आहेत आणि त्यामुळे पांड्या फीट असणं आमच्यासाठी महत्वाचं आहे.'

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने 6 विकेट गमावत 336 धावा केल्या. भारताच्या डावादरम्यान इंग्लंडचा गोलंदाज सॅम कुरन आणि भारताचा स्टार अष्टपैलू हार्दिक पांड्या यांच्यात पुन्हा वाद पाहायला मिळाला. ज्यामुळे अपायरला मध्यस्थी करावी लागली.

पांडया भिडला !

भारताच्या फलंदाजीच्या 46 व्या ओव्हरदरम्यान सॅम कुरनच्या एकाच ओव्हरमध्ये 3 षटकार ठोकले होते. या तीनपैकी दोन षटकार हार्दिक पांड्याने ठोकले होते. शेवटच्या बॉलवर हार्दिकने पुन्हा जोरदार शॉट मारण्याचा प्रयत्न केला. पण हार्दिकने तो चेंडू चुकविला. बॉल रिकामा गेला. कुरनने हार्दिकला काहीतरी म्हटले, त्यानंतर हार्दिकनेही त्याला उत्तर दिले. दरम्यान, पंचला मध्यभागी येऊन बचाव करावा लागला.

पहिल्या वनडे सामन्यातही भारताच्या डावाच्या शेवटच्या ओव्हरमध्ये टॉम कुरनने कृणाल पांड्याला काहीतरी म्हटले होते. त्यानंतर क्रुणाल देखील टॉमवर चिडला होता. या दोघांमधील वाढता वादविवाद पाहता, मैदानावरील पंचांना या दोन्ही खेळाडूंमध्ये मध्यस्थी करावी लागली होती.