T20 World Cup 2022 : T20 विश्वचषकात आज (2 नोव्हेंबर) भारताचा सामना बांगलादेशशी (IND vs BAN Adelaide match) होणार आहे. सेमीफायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी हा सामना भारतासाठी अतिशय सोपा असेल. पण आजच्या भारताच्या सेमीफायनलच्या स्वप्नांवर हवामान (India vs Bangladesh Adelaide Weather) पाणी फिरवू शकते. अॅडलेडमध्ये गेल्या दोन दिवसांपासून सतत पाऊस (Heavy rain forecast) सुरू आहे. बुधवारीही पावसाची शक्यता आहे. सामना वाहून गेल्यास दोन्ही संघांना प्रत्येकी एक-एक गुणावर समाधान मानावे लागेल. यामुळे उपांत्य पेरीची गणितही बिघडू शकतात. (ind vs ban t20 world cup 2022 adelaide weather forecast)
रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाने टी-20 वर्ल्ड (t20 world cup) कपमध्ये आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. त्याच्यासमोर आता या जागतिक स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये धडक मारण्याचे आव्हान आहे. आज 2 नोव्हेंबरला ब्रिस्बेनमध्ये भारताचा सामना बांगलादेशशी (IND vs BAN) होणार आहे. मात्र, पाऊस आणि खराब हवामानामुळे या सामन्यातील चाहत्यांची मजा नक्कीच बिघडू शकते.
गाबा येथे बांगलादेशचा सामना
भारतीय संघाने टी-20 विश्वचषकात आतापर्यंत तीनपैकी दोन सामने जिंकले आहेत. गेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (Ind vs SA) भारताला पराभवाला सामोरे जावे लागले होते. मात्र त्याआधी त्याने पाकिस्तान आणि नेदरलँडविरुद्ध चांगली कामगिरी केली होती. आता रोहित शर्मा अँड कंपनीचा सामना बांगलादेशशी होणार आहे. हा सामना ब्रिस्बेन येथील गाबा येथे होणार आहे.
भारत दुसऱ्या क्रमांकावर
भारतीय संघाला सेमीफायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी बांगलादेशचा (Bangladesh) पराभव होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. संघाचे सध्या 3 सामन्यांत 4 गुण आहेत आणि ते सुपर-12 फेरीच्या गट-3 टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. शाकिब अल हसनच्या नेतृत्वाखालील बांगलादेशचे गुण तेवढेच आहेत. पण भारताचा निव्वळ धावगती त्यापेक्षा सरस आहे. या गटात बांगलादेश तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर झिम्बाब्वे 14 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. पाकिस्तानचे केवळ 2 गुण आहेत तर नेदरलँडचे खातेही उघडलेले नाही.
वाचा : Twitter ने शोधला कमवायचा नवीन पर्याय; महिन्याला मोजावे लागतील 'इतके' पैसे
विजय-पराजय याचा अर्थ काय?
आता उर्वरित दोन सामने भारतासाठी खूप महत्त्वाचे आहेत. टीम इंडियाने बांगलादेशला हरवले तर 6 गुण होतील. यासह संघ गटात अव्वल स्थानी पोहोचेल. यानंतर 6 नोव्हेंबरला मेलबर्नमध्ये भारताचा सामना झिम्बाब्वेशी होणार आहे. तो सामना जिंकणेही भारतासाठी आवश्यक असेल. सध्या गटात अव्वल असलेल्या दक्षिण आफ्रिकेचा पुढील सामना 3 नोव्हेंबरला पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. जर संघ जिंकला तर त्याचे 7 गुण होतील. यानंतर बावुमाच्या संघाला नेदरलँड्सकडून विजय मिळवण्यात फारशी अडचण येणार नाही. अशा परिस्थितीत ती 9 गुणांसह गटात टॉपर राहील. भारत केवळ 8 गुण मिळवू शकतो, तर दक्षिण आफ्रिकेला 9 गुण मिळवण्याची संधी आहे.
सामना रद्द झाल्यास, SF साठी मार्ग बंद आहे का?
पाऊस आणि खराब हवामानामुळे (weather-forecast) बांगलादेशविरुद्धचा सामना रद्द झाल्यास काय होईल हे जाणून घेण्याची भारतीय चाहत्यांना उत्सुकता असेल. वास्तविक, यामुळे भारत आणि बांगलादेश दोघांचे 5-5 गुण होतील. यानंतर बांगलादेशचा सामना पाकिस्तानशी होणार असून, हा सामना अत्यंत चुरशीचा असेल. शकिबच्या संघाने पाकिस्तानला चांगल्या फरकाने हरवले तर साहजिकच भारताला उपांत्य फेरी गाठणे कठीण जाईल.