BCCI Selection Committee : दुसऱ्या वनडे सामन्यात बांगलादेशने (india vs bangladesh) टीम इंडियावर 5 धावांनी विजय मिळवला. या विजयासह बांगलादेशने 2-0 ने मालिका खिशात घातली. या पराभवानंतर भारतीय क्रिकेट फॅन्स चांगलेच भडकले आहेत. या फॅन्सनी सिलेक्शन कमिटीवर (BCCI Selection Committee) अनेक सवाल उपस्थित केले आहेत. तसेच काही फॅन्सनी यानिमित्त काही दिग्गज खेळाडूंची आठवण काढली. हे खेळाडू कोण आहेत, हे जाणून घेऊय़ात.
दुसऱ्या वनडे सामन्यात बांगलादेश (india vs bangladesh) नाणेफेक जिंकून प्रथम बॅटींग करण्याचा निर्णय घेतला. प्रथम बॅटींग करताना बांगलादेश संघाने 7 बाद 271 धावा केल्या.बांगलादेश संघाची सुरुवात चांगली झाली नव्हती. बांगलादेशचे 6 खेळाडू 19 ओव्हरमध्ये केवळ 69 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतले होते. त्यानंतर मैदानात उतरलेल्या महमुदुल्लाह (96 बॉलमध्ये 77 धावा) आणि मेहंदी हसन (83 बॉलमध्ये 100 धावा) यांच्या शानदार खेळीने बांगलादेशला सन्मानजनक धावसंख्या गाठली होती. बांगलादेशने टीम इंडियाला विजयासाठी 272 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र भारतीय संघ 9 विकेट गमावून 266 धावा करु शकला. कर्णधार रोहित शर्माची 28 चेंडूत नाबाद 51 धावांची खेळी व्यर्थ गेली. शेवटच्या चेंडूवर 6 धावा करण्यात रोहित शर्माला अपयश आलं. त्यामुळे भारताचा 5 धावांनी पराभव झाला.
टीम इंडियाचे सिनियर खेळाडू शिखर धवन, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचा गेल्या काही वर्षातला परफॉर्मन्स पाहूयात. 2017 ते 2019 दरम्यान, शिखर धवन (8), विराट कोहली (17) आणि रोहित शर्मा (18) यांनी मिळून भारतासाठी एकूण 43 एकदिवसीय शतके झळकावली. तर 2020 आणि 2022 या वर्षांमध्ये: शिखर धवन (0), विराट कोहली (0), आणि रोहित शर्मा (1) यांनी संयुक्तपणे केवळ एक वनडे शतक झळकावले आहे. सिनियर खेळाडूंचा हा परफॉर्मन्स निवड समितीवर अनेक प्रश्न निर्माण करतो. त्यांना संधी दिल्या पाहिजेत हे ही तितकेच बरोबर आहे.
बांगलादेशविरूद्ध (india vs bangladesh) पराभवानंतर भारतीय क्रिकेट फॅन्सनी टीम इंडियाचा माजी कर्णधार एमएस धोनी, विराट कोहली आणि संजू सॅमसनची आठवण काढली. अनेक फॅन्सने एमएस धोनीची आठवण काढली.तो टीम इंडियाच्या कर्णधारपदी हवा होता, असे म्हटले आहे. तर अनेकांनी विराट कोहली देखील कर्णधारपदी पाहिजे होता असे म्हटले आहे. काहींनी पुन्हा संजू सॅमसनला संघात स्थान न दिल्याची खंत व्यक्त केली.
दरम्यान संघाच्या कामगिरीचा विचार केला तर, आशिया चषक 2022 ची टीम इंडिया प्रमुख दावेदार असल्याचे बोलले जात होते.मात्र कामगिरीच्या बाबतीत टीम इंडिया काही विशेष करू शकला नव्हती. त्यानंतर T20 विश्वचषक (T20 World Cup 2022) मध्येही भारतीय संघाला उपांत्य फेरीत इंग्लंडविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे भारत मोठ्या स्पर्धांमध्ये अपयशी ठरल्याचे पुन्हा अधोरेखीत झाले.
टी20 वर्ल्ड कपमधील पराभवानंतर भारताच्या सिलेक्शन टीमवर (BCCI Selection Committee) प्रश्न चिन्ह उपस्थित करण्यात आले होते. यानंतर बीसीसीआयने सिलेक्शन कमिटीच (BCCI Selection Committee) बरखास्त केली होती. आता नवीन कमिटी गठीत करण्यात येणार आहे. ही कमिटी कसा संघ निवडते? युवा खेळाडूंना संधी देते का नाही, हे पाहावे लागणार आहे.