India vs Bangladesh 2nd ODI, Weather Forecast: भारत आणि बांगलादेश या दोन्ही देशांमध्ये आज (बुधवारी) ढाका येथे दुसरा एकदिवसीय सामना खेळवला जाणार आहे. ढाका येथील शेर-ए-बांग्ला क्रिकेट स्टेडियममध्ये होणाऱ्या या सामन्यामध्ये विजयी होणं Team India साठी अत्यंत महत्त्वाचं आहे. बांगलादेशनं या मालिकेत पहिल्याच सामन्यात विजय मिळवत 1-0 अशी आघाडी घेतली. त्यामुळं आता किमान दुसरा सामना जिंकत मालिकेतील आव्हान कायम ठेवण्याचं प्राथमिक लक्ष्य संघापुढे असेल. (IND vs BAN 2nd ODI weather forecast report rain prediction)
ढाकामध्ये भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये सामना खेळवला जाण्यापूर्वी सर्वांच्याच नजरा हवामाकडे लागल्या आहेत. सहसा पावसाचे काळे ढग सामन्याची संपूर्ण रुपरेषाच बदलून टाकत असतात. पण, बांगलादेशमध्ये मात्र तशी परिस्थिती दिसणार नाही. हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार ढाकामध्ये दिवसभर आकाश निरभ्र असेल. तर, तापमान 24 अंशांपर्यंत असेल. दुपारी 1 ते 3 च्या दरम्यान तापमान 28 ते 29 अंशांदरम्यान असेल. तर, रात्रीच्या वेळी ते 21 अंशापर्यंत खाली येईल. हवेचा वेग 7-11 किमी/ ताशी इतका असेल. तर आर्द्रता 74 टक्के इतकी असेल. त्यामुळं दूरदूरपर्यंत हा सामना रद्द होण्याची चिन्हं नाहीत.
यजमान बांगलादेशनं पहिल्याच एकदिवसीय सामन्यात विजयी होत मालिकेत आघाडी घेतली. पहिल्या सामन्यामध्ये भारतीय फलंदाजांची फळी फार प्रभावी काम करु शकली नाही. 41.2 षटकांमध्ये संघानं सर्वबाद होत अवघ्या 186 धावा केल्या. के.एल.राहुलनं मात्र इथं 73 धावांची खेळी केली.
सामन्यात वर्चस्व राहिलं ते म्हणजे बांगलादेशच्या गोलंदाजांचं. या सामन्यात शाकिब अल हसन यानं 5 तर, इबादत हुसैन यानं 4 गडी बाद केले. बांगलादेशच्या खेळाडूंचा मनसुबा आणि त्यांचा आत्मविश्वास पाहता दुसऱ्या सामन्यामध्ये हवामान जरी दोन्ही संघांच्या पारड्यात असलं तरीही नशीब कोणाला साथ देणार हे पाहणं औत्सुक्याचं असेल.