T20 World Cup आधीच सुर्याला आला कंटाळा, Stump Mic मध्ये सगळं रेकॉर्ड झालं, म्हणाला..

T20 World Cup:  Suryakumar Yadav ला काय झालंय? LIVE सामन्यात म्हणाला...

Updated: Oct 19, 2022, 11:14 PM IST
T20 World Cup आधीच सुर्याला आला कंटाळा, Stump Mic मध्ये सगळं रेकॉर्ड झालं, म्हणाला.. title=
ind vs aus warmup match Suryakumar Yadav heard saying on stump mic gets out next ball

IND vs AUS: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात गाबा येथे खेळल्या गेलेल्या T20 World Cup मधील पहिल्या सराव सामन्यात भारताने यजमान ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये अष्टपैलू कामगिरी करत भारताने बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा (Australia) पराभव केलाय. त्यामुळे आता भारताने वर्ल्ड कपवर दावेदारी देखील ठोकल्याचं पहायला मिळतंय. असं असलं तरी, भारताच्या सर्वात मोठ्या मॅचविनरला (MatchWinner) कंटाळा आलाय.

गेल्या काही महिन्यांपासून भारताचा मिडल ऑर्डर बॅटर सुर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) चांगल्या फॉर्ममध्ये आहे. कोणत्याही परिस्थितीत मैदानात उतरून सामना फिरवण्याची क्षमता सुर्यकुमारमध्ये आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील सराव सामन्यात सुर्याने अर्धशतक ठोकलं. त्यामुळे भारताला मोठी धावसंख्या उभारता आली. (Suryakumar Yadav Audio recorded in Stump Mic)

या सामन्यातील सुर्यकुमारचा एक व्हिडीओ सध्या सोशल मी़डियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये एक ऑडिओ स्टंप माइकमध्ये (Audio Stump Mic) पकडला गेला, जो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अर्धशतक पूर्ण केल्यानंतर, सूर्यकुमार दुसऱ्या टोकाला फलंदाजी करणाऱ्या अक्षर पटेलला (Akshar Patel) बोलत होता. त्यावेळचा आवाज स्टम्प माईकमध्ये कैद झाला आहे.

पाहा व्हिडीओ- 

'मारने का मूड नहीं हो रहा यार..', असं सुर्यकुमार अक्षरला म्हणाला. ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर ही घटना घडली. त्यानंतर चौथ्या बॉलला सुर्या आऊट झाला. त्यानंतर हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल (Suryakumar Yadav Audio recorded in Stump Mic) होताना दिसतोय.

आणखी वाचा - T20 World Cup आधी पाकिस्तानला मोठा झटका, आता दुसरी संधी नाही

दरम्यान, टीम इंडियाचा (Team India) पहिला सामना येत्या 23 तारखेला पाकिस्तानविरुद्ध (Ind VS Pak) होणार आहे. त्यामुळे आता टीम इंडिया कसून तयारी करताना दिसत आहे. वर्ल्ड कप (T20 World Cup) भारतात आणण्यासाठी रोहितसेना पुर्ण तयारी करताना दिसत आहे. त्यामुळे आता वर्ल्ड कप रंगतदार होणार यात काही शंकाच नाही