IND vs AUS: ऑस्ट्रेलियाच्या भेदक माऱ्याचा सामना करणार 'हा' सलामीवीर, Harbhajan Singh ने सुचवला सॉलिड पर्याय!

Harbhajan Singh On Shubman Gill: अनेक माजी क्रिकेटपटूही बॉडर गावस्कर ट्रॉफीसाठी (Border Gavaskar Trophy 2023) आपली मते आणि सूचना देत आहेत. हरभजन सिंगने टीम इंडियाच्या सलामीच्या जोडीसाठी एक महत्त्वाची सूचना केली आहे.

Updated: Feb 6, 2023, 09:12 PM IST
IND vs AUS: ऑस्ट्रेलियाच्या भेदक माऱ्याचा सामना करणार 'हा' सलामीवीर, Harbhajan Singh ने सुचवला सॉलिड पर्याय! title=
Harbhajan Singh, IND vs AUS

India vs Australia, 1st Test: टीम इंडियामध्ये (Team India) प्रत्येक स्थानासाठी अनेक खेळाडू कधी येणार याची वाट पाहत असतात. मात्र, त्यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवण्याची संधी फार क्वचित मिळते. त्यातही संधीचं सोनं करणं हे फार मोठं चॅलेंज असतं. अशाच एका खेळाडूने संधीचं सोनं केल्याने त्याची टीम इंडियात निवड करण्यात आली आहे. त्यातही त्याला कॅप्टन रोहितबरोबर (Rohit Sharma) खेळवण्यात व्हावी, अशी मागणी केली जात आहे. होय, टीम इंडियाचा माजी फिरकीपटू हरभजन सिंहने (Harbhajan Singh) मोठं वक्तव्य केलंय.

काय म्हणाला Harbhajan Singh?

ओपनिंग पार्टनरशिप ही क्रिकेटमधील सर्वात महत्त्वाची गोष्ट असते. कोणत्याही मालिकेत सलामीची जोडी टोन सेट करत असते. शुभमन गिल (Shubman Gill) सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. त्यामुळे माझ्या मते रोहित आणि शुभमनने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ओपनिंगला खेळले पाहिजे, असं हरभजन (Harbhajan Singh On Shubman Gill) म्हणाला आहे.

केएल राहुल (KL Rahul) हा देखील अव्वल खेळाडू असला तरी त्याचा अलीकडचा रेकॉर्ड त्याच्या बाजूने नाही. तर दुसरीकडे गिल त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम फॉर्ममध्ये आहे. गेल्या महिनाभरात त्याने अनेक विक्रम मोडीत काढले आहेत, त्यामुळे त्याला संधी मिळावी, अशी आशा हरभजनने व्यक्त केली आहे. त्याने एवढ्या धावा केल्यात, त्यामुळे मला वाटतं की भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये (Playing XI) गिल खेळण्यास पात्र आहे, असंही हरभजन म्हणालाय.

आणखी वाचा - IND vs AUS: भारत वि.ऑस्ट्रेलिया बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी चे संपूर्ण वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या कुठे आणि कसा बघाल LIVE सामना...

दरम्यान, न्यूझीलंडविरुद्धच्या शेवटच्या टी-ट्वेंटी (Ind vs Nz T20) सामन्यामध्ये शुभमनने दमदार शतकी खेळी केली. 63 चेंडूंमध्ये 126 धावांची खेळी केलेल्या शुभमनवर कौतुकाचा वर्षाव होतोय. त्यामुळे आता आगामी टेस्टमध्ये शुभमनच्या कामगिरीवर सर्वांचं लक्ष आहे.