मुंबई : पहिल्या टी-२० सामन्यात जडेजाच्या जागी दुसऱ्या इनिंगमध्ये युजवेंद्र चहलला खेळण्याची संधी मिळाली आणि त्याने शानदार गोलंदाजी करत तीन विकेटही घेतल्या. चहलच्या या कामगिरीनंतर त्याला सिडनीतील दुसर्या टी-२० सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आले पण त्याच्या बॉलिंगवर ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी चांगले रन काढले.
पहिल्या टी-२० सामन्यात आणि तिसर्या वनडे सामन्यात चहलला वगळण्यात आले कारण त्याने पहिल्या आणि दुसर्या वनडे सामन्यात अधिक धावा दिल्या होत्या. पहिल्या टी-२० मधील कामगिरीच्या जोरावर त्याला दुसर्या सामन्यात संधी मिळाली. पण चहलने ४ ओव्हरमध्ये ५१ धावा दिल्या.
या सामन्यात चहलने जास्त रन दिले, पण त्याने स्टीव्ह स्मिथ ४६ धावांवर खेळत असताना त्याची विकेट घेतली. जास्त रन दिले असले तरी त्याने आज जसप्रीत बुमराहसह टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक विकेट घेणाऱ्यांच्या यादीत अव्वल स्थान गाठलं आहे. चहलच्या नावावर आता टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात ५९ विकेट झाल्या आहेत.
टी-२० मध्ये भारताकडून सर्वाधिक विकेट्स
युजवेंद्र चहल - ५९ विकेट
जसप्रीत बुमराह - ५९ विकेट
आर अश्विन - ५२ विकेट
भुवनेश्वर कुमार - ४१ बळी
चहलने टी-२० सामन्यात ५० किंवा अधिक धावा देण्याची ही तिसरी वेळ आहे. यापूर्वी टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मो. सिराज आणि क्रुणाल पांड्या यांनी दोन सामन्यात ५० किंवा त्याहून अधिक धावा दिल्या आहेत. आता चहलने या दोघांनाही मागे सोडले आहे. या सामन्यात टी नटराजने 4 ओव्हरमध्ये २० धावा देऊन २ विकेट घेतल्या. तर शार्दुल ठाकूरला १ विकेट मिळाली. कांगारू संघाने २० ओव्हरमध्ये ५ विकेट गमवत १९४ धावा केल्या आहेत.