IND Vs AUS 4th Test : Ahmedabad मध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना, 'हा' विक्रम करुन टीम इंडिया बनणार जगातील पहिला देश?

IND vs AUS Live Score : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा कसोटी सामना आजपासून गुजरातमधील अहमदाबादमध्ये रंगतोय. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज (Anthony Albanese) आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.   

Updated: Mar 9, 2023, 10:11 AM IST
IND Vs AUS 4th Test : Ahmedabad मध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना, 'हा' विक्रम करुन टीम इंडिया बनणार जगातील पहिला देश? title=
IND Vs AUS 4th Test Ahmedabad IND vs AUS Live Score team india create history Sports news in marathi

IND Vs AUS 4th Test Ahmedabad : भारत - ऑस्ट्रेलियादरम्यान (IND vs AUS)  बॉर्डर गावस्कर कसोटी मालिका (border gavaskar trophy 2023) मधील चौथा आणि शेवटचा सामना सुरु झाला आहे. ऑस्ट्रेलिया-आफ्रिकेच्या नावावरही नाही असा विक्रम  (Ahmedabad) करण्यासाठी टीम इंडिया मैदानात (India vs Australia 4th test) उतरली आहे.आतापर्यंत झालेल्या मालिकेमध्ये तीन सामन्यांमध्ये भारताने दोन सामने जिंकले आहेत. जर भारताने हा कसोटी सामना जिंकला तर टीम इंडिया इतिहास रचणार आहे. (Sports news in marathi)

टीम इंडिया बनणार जगातील पहिला देश?

अहमदाबादमध्ये सुरु असलेल्या कसोटी सामन्यात टीम इंडिया विक्रम करण्यासाठी मैदानात उतरली आहे. मायदेशात टीम इंडियाने आतापर्यंत सलग 15 कसोटी मालिका जिंकल्या आहेत. जर चौथ्या कसोटी सामनाही भारताने जिंकल्यास हा टीम इंडियाचा सलग 16वा विजय असणार आहे. हा विजय मिळवून टीम इंडिया विश्वविक्रम प्रस्थापित करणार आहे. आतापर्यंत असा विक्रम ऑस्ट्रेलिया-आफ्रिका टीमनेही केलेला नाही. नोव्हेंबर 2012 नंतर मायदेशात टीम इंडियाने एकही मालिका गमावलेली नाही. (IND Vs AUS 4th Test Ahmedabad Narendra Modi IND vs AUS Live Score team india create history Sports news in marathi)

'या' मालिकेवर टीम इंडियाचा कब्जा!

1. ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत (2013) -  4-0 ने विजय 

2. वेस्ट इंडिज विरुद्ध भारत (2013) - 2-0 ने विजय  

3. दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (2015)-  3-0 ने विजय 

4. न्यूझीलंड विरुद्ध भारत (2016) - 3-0 ने विजय   

5. इंग्लंड विरुद्ध भारत (2016) -  4-0 ने विजय  

6. बांगलादेश विरुद्ध भारत (2017) -  1-0 ने विजय  

7. ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत (2017) -  2-1 ने विजय  

8. श्रीलंका विरुद्ध भारत (2017) -  1-0 ने  विजय  

9. अफगाणिस्तान विरुद्ध भारत (2018) -  1-0 ने विजय  

10. वेस्ट इंडिज विरुद्ध भारत (2018) - 2-0 ने विजय  

11. दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (2019) - 3-0 ने विजय  

12. बांगलादेश विरुद्ध भारत (2019) -  2-0 ने विजय  

13. इंग्लंड विरुद्ध भारत (2021) -  3-1 ने विजय  

14. न्यूझीलंड विरुद्ध भारत (2021) - 1-0 ने विजय  

15. श्रीलंका विरुद्ध भारत (2022) - 2-0 ने विजय