Ind vs Aus 2nd Test : दुसऱ्या टेस्टपुर्वी टीम इंडियाच्या Playing XI मध्ये बदल, स्टार खेळाडूची एन्ट्री

Shreyas Iyer Ind vs Aus Test: टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात दुसरा कसोटी सामना 17 फेब्रुवारीपासून दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर (arun jaitley stadium) खेळवला जाणार आहे. या सामन्यापुर्वी टीम इंडियाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये मोठे बदल झाला आहे. एका स्टार खेळाडूची संघात एन्ट्री झाली आहे.

Updated: Feb 14, 2023, 09:27 PM IST
Ind vs Aus 2nd Test : दुसऱ्या टेस्टपुर्वी टीम इंडियाच्या Playing XI मध्ये बदल, स्टार खेळाडूची एन्ट्री  title=

Shreyas Iyer Ind vs Aus Test: टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात दुसरा कसोटी सामना 17 फेब्रुवारीपासून दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर (arun jaitley stadium) खेळवला जाणार आहे. या सामन्यापुर्वी टीम इंडियाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये मोठे बदल झाला आहे. एका स्टार खेळाडूची संघात एन्ट्री झाली आहे. हा स्टार खेळाडू दूखापतग्रस्त झाला होता.मात्र आता तो फिट झाला असून त्याला दुसऱ्या टेस्ट सामन्याच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये (Playing XI) संधी मिळते का हे पाहावे लागणार आहे.

 

हे ही वाचा : शुबमन गिल-सारा तेंडूलकरच्या अफेअरची पुन्हा चर्चा, फोटोने उडवली एकच खळबळ 

 

ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या पहिल्या टेस्ट सामन्याला मुकलेला स्टार फलंदाज श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) पूर्णपणे तंदुरुस्त झाला आहे.त्यामुळे आता त्याचा संघात समावेश करण्यात आला आहे. श्रेयस अय्यर लवकरच दिल्ली कसोटीसाठी संघात सामील होणार आहे. बीसीसीआयने याबाबत ट्विट करून माहिती दिली आहे.

बीसीसीआय ट्विटमध्ये काय म्हणाल? 

टीम इंडियाचा फलंदाज श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) पाठीच्या दुखापतीनंतर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये यशस्वीरित्या पुनर्वसन पूर्ण केले आहे आणि बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने त्याला मंजुरी दिली आहे. श्रेयस बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीपासून संघात सामील होणार आहे,अशी माहिती बीसीसीआयने एका प्रसिद्धीपत्रकात दिली आहे. 

 

हे ही वाचा : टीम इंडियाचा स्टार खेळाडू पृथ्वी शॉ अडकला लग्नबंधनात? सोशल मीडियावर दिली माहिती 

 

अय्यरला (Shreyas Iyer) कसोटी सामन्यात थेट मैदानात उतरवता येणार नाही.  मैदानात त्याला 90 ओव्हर क्षेत्ररक्षण करावे लागेल आणि त्याला बराच वेळ फलंदाजी करावी लागणार आहे. चेतन शर्माच्या नेतृत्वाखालील निवड समिती 1 ते 5 मार्च दरम्यान मध्य प्रदेश विरुद्ध इराणी चषक सामन्यात फिटनेस सिद्ध करण्यासाठी अय्यरचा उर्वरित भारतीय संघात समावेश करण्याची शक्यता होती. मात्र तसे काही झाले नाही आणि त्याला संघात सामील करून घेण्यात आले.

दरम्यान श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) महिनाभर कोणतीही स्पर्धा खेळली नाही. मात्र त्याला आता थेट प्लेइंग-11 मध्ये स्थान मिळते की नाही हे पाहावे लागणार आहे. तसेच टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया (India vs Australia) विरूद्धची नागपूर टेस्ट एक डाव आणि 132 धावांनी जिंकली होती. या विजयानंतर टीम इंडियाने मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. 

टीम इंडिया संघ : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), आर. अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, सूर्यकुमार यादव.