IND vs AUS Test Series : भारत - ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेसंदर्भात BCCI चा मोठा निर्णय!

IND vs AUS 1st Test: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 4 सामन्यांची कसोटी मालिका 9 फेब्रुवारीपासून नागपुरात सुरु होत आहे. जाणून घ्या हा सामना कधी आणि कुठे पाहाल... 

Updated: Feb 3, 2023, 12:14 PM IST
IND vs AUS Test Series : भारत - ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेसंदर्भात BCCI चा मोठा निर्णय!  title=

IND vs AUS 1st Test Series : आयसीसी कसोटी क्रमवारीतील अव्वल दोन संघ आमनेसामने येणार आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS ) यांच्यातील चार कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 9 फेब्रुवारीपासून नागपुरात सुरू होणार आहे. आयसीसी कसोटी क्रमवारीत ऑस्ट्रेलिया सध्या पहिल्या क्रमांकावर आहे. तर भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. दोन्ही देशांमधील कसोटी मालिका तब्बल सहा वर्षानंतर भारतीय भूमीवर खेळवली जात आहे. याचदरम्यान क्रिकेट चाहत्यांना बीसीसीआयने (BCCI) आनंदाची बातमी दिली आहे. 

दरम्यान 2017 मध्ये भारतात खेळल्या गेलेल्या शेवटच्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताने ऑस्ट्रेलियाचा 2-1 ने पराभव केला होता. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेत नियमित कर्णधार रोहित शर्मा टीम इंडियाचे नेतृत्व करेल. तसेच भारतीय चाहत्यांना आता दोन्ही संघांमध्ये खेळली जाणारी ही मालिका मोफत पाहता येणार आहे. त्याची अधिकृत घोषणा करण्यात देखील यावेळी करण्यात आली  असून भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका स्टार स्पोर्ट्स तसेच डीडी स्पोर्ट्स फ्री टू एअर वाहिनीवर दाखवली जाणार आहे.

वाचा: सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी! 

कसोटी मालिकेचं वेळापत्रक

पहिली कसोटी, 9-13 फेब्रुवारी, सकाळी 9.30, नागपूर

दुसरी कसोटी, 17-21 फेब्रुवारी, सकाळी 9.30, दिल्ली

तिसरी कसोटी, 1-5 मार्च, सकाळी 9.30, धर्मशाळा

चौथी कसोटी, 9-13 मार्च, सकाळी 9.30, अहमदाबाद

 टीम इंडियाचा संघ

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज , उमेश यादव , जयदेव उनाडकट, सूर्यकुमार यादव.

ऑस्ट्रेलिया संघ

पॅट कमिन्स (कर्णधार), अ‍ॅश्टन आगर, स्कॉट बोलँड, अ‍ॅलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, जोश हेझलवूड, पीटर हँड्सकॉम्ब, ट्रॅव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लियॉन, लान्स मॉरिस, टॉड मर्फी, मॅथ्यू रेनशॉ, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मिचेल स्वीपसन, डेव्हिड वॉर्नर.