IND vs AUS: कसोटीत टीम इंडियाचा लाजीरवाणा पराभव, मालिकेत १-० ने ऑस्ट्रेलियाची आघाडी

ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाने एडिलेड ओव्हलमध्ये  (Adelaide Oval) टीम इंडियाचा ८ गडी राखून पराभव केला आहे.  

Updated: Dec 19, 2020, 03:40 PM IST
IND vs AUS: कसोटीत टीम इंडियाचा लाजीरवाणा पराभव, मालिकेत १-० ने ऑस्ट्रेलियाची आघाडी  title=

मुंबई : ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाने एडिलेड ओव्हलमध्ये  (Adelaide Oval) टीम इंडियाचा ८ गडी राखून पराभव केला आहे. या मालिकेत भारत आता ०-१ ने मागे आहे. ऑस्ट्रेलियाच्या (Australia) गोलंदाजांपुढे टीम इंडियाच्या फलंदाजीने गुडघे टेकले. त्यामुळे टीम इंडियाला पराभवाला सामोरे जावे लागले.

हेझलुडची शानदार गोलंदाजी

ऑस्ट्रेलियाकडून (Australia) जोश हेझलवूडने  (Josh Hazlewood)ने भारताच्या दुसर्‍या डावात कोणत्याही फलंदाजाला मैदानावर टीकू दिले नाही आणि त्याने अवघ्या ८ धावांत ५ बळी घेत मोठी कामगिरी केली. या सामन्याच्या पहिल्या डावात त्याने १ विकेट घेतली होती.

टीम इंडिया फलंदाजी अपयशी 

टीम इंडियाने  (Team India) पहिल्या डावात २४४ धावा केल्या होत्या, पण दुसऱ्या डावात भारतीय संघ पूर्णपणे ढेपाळला. भारताची संपूर्ण टीम ३६ धावांवर बाद झाली. कसोटी क्रिकेटमधील भारतीय संघातील ही सर्वात कमी धावासंख्या ठरली आहेत. या लाजीरवाण्या खेळामुळे टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला.

ऑस्ट्रेलियासाठी ९० धावांचे लक्ष्य

यजमान ऑस्ट्रेलियन संघाला विजयासाठी ९० धावांचे सोपे लक्ष्य होते. ऑस्ट्रेलिया संघाने दोन बळीच्या मोबदल्यात ९० धावांचे टार्गेट पूर्ण केले. आणि कसोटी सामना खिशात टाकला. ही कसोटी केवळ तीन दिवसात संपली. 

बर्न्सचे अर्धशतक

जो बर्न्सने  (Joe Burns) आज विजयी अर्धशतक केले. त्याने शेवटच्या चेंडूवर षटकार लावून केवळ सामना जिंकला नाही तर ६३ चेंडूत आपले अर्धशतकही पूर्ण केले. त्याने एकूण ५१ धावा करत ऑस्ट्रेलियाला कसोटीत विजय मिळवून दिला.

टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात एडिलेड येथे सुरु असलेल्या पहिल्या डे-नाईट कसोटी सामन्याच्या दुसर्‍या दिवशी एकूण १५ बळी घेतले गेले. टीम इंडियाने पहिल्या डावात २४४ धावा केल्या, त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ पहिल्या डावात  १९१  धावा करू शकला. भारतीय गोलंदाजीने पहिल्या डावात उत्कृष्ट गोलंदाजीच्या जोरावर ५३ धावांची आघाडी मिळविली. दिवसाचा खेळ संपेपर्यंत टीम इंडियाने १ गडी गमावून ९ धावा केल्या. टीम इंडियाकडे आता ६२ धावांची आघाडी होती. मात्र आज टीम इंडिया चांगली कामगिरी करु शकला नाही. केवळ ३६ धावांत टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाने गुंडाळले.