Hockey WC: भारतीय हॉकी संघानं 1975 साली थेट पंतप्रधान इंदिरा गांधींना दिला इशारा, त्यानंतर झालं असं की...

Hockey World Cup:  वर्ल्डकप इतिहासातील 14 पर्वात भारतानं आतापर्यंत एकदाच जेतेपदावर नाव कोरलं आहे. हा  वर्ल्डकप 1975 साली मलेशियात आयोजित करण्यात आला होता. मात्र या वर्ल्डकप स्पर्धेत भाग घेण्यासाठी भारतीय संघाला चांगलाच संघर्ष करावा लागला. वर्ल्डकपसाठी मेहनत करूनही भारताचं स्पर्धेत खेळणं कठीण झालं होतं.

Updated: Jan 13, 2023, 03:43 PM IST
Hockey WC: भारतीय हॉकी संघानं 1975 साली थेट पंतप्रधान इंदिरा गांधींना दिला इशारा, त्यानंतर झालं असं की... title=

India won 1975 hockey World Cup despite dirty infights: हॉकी वर्ल्डकप 2023 स्पर्धेचं यजमानपद भारताकडे आहे. भारताला सलग दुसऱ्यांदा वर्ल्डकप आयोजनाचा मान मिळाला आहे. हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ असला तरी तितकी क्रेझ पाहायला मिळत नाही. क्रिकेटवेड्या देशात भारतीय हॉकीची स्थिती दयनीय आहे, असंच म्हणावं लागेल. पण भारतीय हॉकीने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला सुवर्णकाळ गाजवला आहे. वर्ल्डकप इतिहासातील 14 पर्वात भारतानं आतापर्यंत एकदाच जेतेपदावर नाव कोरलं आहे. हा  वर्ल्डकप 1975 साली मलेशियात आयोजित करण्यात आला होता. मात्र या वर्ल्डकप स्पर्धेत भाग घेण्यासाठी भारतीय संघाला चांगलाच संघर्ष करावा लागला. वर्ल्डकपसाठी मेहनत करूनही भारताचं स्पर्धेत खेळणं कठीण झालं होतं. स्पर्धेत न खेळताच भारतीय संघाला पराभव सहन करावा लागणार होता. त्यामुळे भारतीय संघात अस्वस्थता पसरली होती. कारण फेडरेशनच्या अंतर्गत राजकारणाचा मोठा फटका बसणार होता. अशा स्थितील भारतीय संघाने तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी एक पत्र लिहिलं आणि संघाने वर्ल्डकपमध्ये इतिहास रचला. 

हॉकी इंडिया त्या काळात इंडियन हॉकी फेडरेशनच्या नावाने ओळखलं जात होतं. मात्र 1974 साली अंतर्गत वादामुळे दोन गटात विभागणी झाली होती. इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनला फेडरेशनचा कार्यभार सोपण्यात आला. मात्र वाढता वाद पाहता सरकारनं दखल घेत इंडियन हॉकी फेडरेशनच्या निवडणुकांची घोषणा केली. निवडणुका पार पडल्यानंतरही इंडियन ऑलिम्पिक असोसिएशननं जबाबदारी स्वीकारण्यास नकार दिला. दोन्ही गट आपल्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला मलेशियात नेण्यास धडपड करत होते. या वादात भारतीय संघाची अवस्था इकडे आड तिकडे विहीर अशी झाली होती. वर्ल्डकप जवळ येत असल्याने अस्वस्थता वाढली होती. या स्थितीमुळे पंजाबचे तत्कालीन मुख्यमंत्री ज्ञानी जेल सिंग यांनी संघाचं सराव शिबीर पंजाब विश्वविद्यालयात आयोजित केलं. 

बातमी वाचा: Hockey World Cup 2023 स्पर्धेत 'चक दे इंडिया'! एक गोल झळकावताच रचणार इतिहास

भारतीय हॉकी संघानं सराव शिबीरात चांगलाच घाम गाळला. पण असं असूनही इंडियन हॉकी फेडरेशन आणि इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनमधील वाद संपता संपत नव्हता. वर्ल्डकपसाठी दोन आठवड्यांचा अवधी शिल्लक असताना खेळाडूंचा पारा चढला आणि संघाने थेट इशारा देणारं पत्र पंतप्रधान इंदिरा गांधी यांना लिहीलं. 

बातमी वाचा: Hockey WC 2023: "भारतीय संघानं पाकिस्तानात पाय ठेवला तर...", हे वक्तव्य आणि झालं असं की...!

पत्रात लिहिलं होतं की, 'आम्ही घाणेरड्या राजकारणामुळे वैतागलो आहोत. आमच्यावर प्रत्येक जण हक्क गाजवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे हॉकीचं नुकसान होत आहे. आमच्याकडे कोणताही पर्याय नाही. आम्ही पण माणसं आहोत. घाणेरड्या राजकारणामुळे खेळाचं नुकसान होत आहे. मागच्या तीन महिन्यात आम्ही दररोज सात तास सराव करत आहोत. कारण आम्हाला वर्ल्डकप जिंकायचा आहे. जर पुढच्या तीन दिवसात आम्ही तिथे पोहोचलो नाही तर आम्ही कायमचं हॉकी खेळणं सोडून देऊ.'या पत्राची दखल तात्काळ घेण्यात आली. पत्राची पोहोच होताच दोन दिवसात भारतीय हॉकी संघ 1975 वर्ल्डकपसाठी मलेशियात रवाना झाला. या वर्ल्डकप स्पर्धेत भारताने अपेक्षित कामगिरी केली आणि विश्वचषकावर नाव कोरलं.