Asia Cup : पाक-श्रीलंका सामना पावसामुळे रद्द झाला तर...; फायनलसाठी 'ही' टीम होणार क्वालिफाय, पाहा कसं आहे समीकरण

Asia Cup 2023 : टीम इंडियाने लंकेचा पराभव करत फायनलमध्ये धडक मारलीये. दरम्यान फायनलमध्ये भारताविरूद्ध कोण पाकिस्तान ( Ind vs Pakistan ) की श्रीलंका खेळणार हा प्रश्न आहे. अशातच पाकिस्तान विरूद्ध श्रीलंकेचा ( Ind vs Sl ) सामना पावसाने रद्द झाला तर कोणती टीम फायनल गाठणार हे पाहूयात.

सुरभि जगदीश | Updated: Sep 13, 2023, 09:45 AM IST
Asia Cup : पाक-श्रीलंका सामना पावसामुळे रद्द झाला तर...; फायनलसाठी 'ही' टीम होणार क्वालिफाय, पाहा कसं आहे समीकरण title=

Asia Cup 2023 : येत्या रविवारी एशिया कपची ( Asia Cup 2023 ) फायनल रंगणार आहे. या फायनल सामन्याचं तिकीट टीम इंडियाने यापूर्वीच मिळवलंय. मंगळवारी श्रीलंका विरूद्ध भारत ( Ind vs Sl ) यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यात 41 रन्सने टीम इंडियाने लंकेचा पराभव करत फायनलमध्ये धडक मारलीये. दरम्यान फायनलमध्ये भारताविरूद्ध कोण पाकिस्तान ( Ind vs Pakistan ) की श्रीलंका खेळणार हा प्रश्न आहे. अशातच पाकिस्तान विरूद्ध श्रीलंकेचा ( Ind vs Sl ) सामना पावसाने रद्द झाला तर कोणती टीम फायनल गाठणार हे पाहूयात.

एशिया कपचा फायनल सामना 17 सप्टेंबर रोजी कोलंबोतील आर प्रेमदासा क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. 12 सप्टेंबरला श्रीलंकेचा पराभव करून टीम इंडियाने ( Team India ) आशिया कप 2023 च्या अंतिम फेरीत धडक मारलीये. अशा परिस्थितीत या सामन्यानंतर एशिया कप 2023 पॉइंट टेबलमध्ये काय बदल झाले ते पाहूयात.

भारताचा श्रीलंकेवर विजय

मंगळवारच्या सामन्यात रोहित शर्माने टीम इंडिया (IND vs SL) प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर भारतीय खेळाडूंची कामगिरी काही खास दिसून आली नाही. मात्र रोहित शर्माच्या अर्धशतकाच्या जोरावर टीम इंडियाने 213 रन्सपर्यंत मजल मारली. त्याच्याशिवाय इतर कोणत्याही फलंदाजाला उत्तम फलंदाजी करता आली नाही. टीम इंडिया 49.1 ओव्हर्समध्ये ऑल आऊट झाली. प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संघही फलंदाजीत फ्लॉप झाली. अखेर टीम इंडियाने 41 रन्सने लंकेवर विजय मिळवला.

पाकिस्तान-श्रीलंका सामन्यात पाऊस पडला तर...

भारत विरुद्ध श्रीलंका सामना झाल्यानंतर आशिया कप 2023 च्या पॉईंट टेबलमध्ये टीम इंडिया पहिल्या क्रमांकावर आहे. भारताविरूद्धचा सामना गमावल्यानंतर श्रीलंका दुसऱ्या स्थानावर पोहोचलीये. त्यानंतर पाकिस्तानची टीम एक विजय आणि एक पराभवासह तिसऱ्या स्थानावर आहे. बांगलादेश बॅक टू बॅक 2 पराभवानंतर तळाला आहे. 

आता 14 सप्टेंबरला अंतिम फेरी गाठण्यासाठी पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात सामना रंगणार आहे. या सामन्यात विजयी टीम 17 सप्टेंबरला अंतिम फेरीत भारताशी भिडणार आहे. मात्र जर या सामन्यात पाऊस आला तर आणि सामना रद्द झाला तर दोन्ही टीमकडे 1-1 पॉईंट जाईल. म्हणजेच श्रीलंका आणि पाकिस्तान या दोन्ही टीमचे 3-3 पॉईंट्स होतील. अशावेळी नेटनेटच्या जोरावर दोघांपैकी एक टीम फायलन गाठेल.