World Cup 2023: क्रिकेटचा देव म्हणतो 'हे' चार संघ जातील सेमीफायनलला, या' संघाला ठेवलं बाहेर

World Cup 2023: आयसीसी विश्वचषक स्पर्धेला सुरुवात झाली आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने सेमीफायनल गाठणाऱ्या आपल्या पसंतीच्या चार संघांची नावं सांगितली आहेत. विशेष म्हणजे यात आशियातल्या केवळ एका संघाचा समावेश आहे. 

राजीव कासले | Updated: Oct 6, 2023, 02:13 PM IST
World Cup 2023: क्रिकेटचा देव म्हणतो 'हे' चार संघ जातील सेमीफायनलला, या' संघाला ठेवलं बाहेर title=

ICC World Cup 2023 : आयसीस एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचं बिगुल वाजलं आहे. गतविजेत्या इंग्लंड आणि उपविजेत्या न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्याने (England vs New Zealand) स्पर्धेला सुरुवात झाली. 2019 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील पराभवाचा व्याजासह बदला घेत न्यूझीलंडने इंग्लंडचा धु्व्वा उडवला आणि विश्वचषक स्पर्धेची धमाकेदार सुरुवात केली. पुढचे 46 दिवस आात 10 संघांमध्ये असे चुरशीचे सामने क्रिकेज चाहत्यांना पाहिला मिळणार आहेत. 19 नोव्हेंबरला विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे. तर 15 आणि 16 नोव्हेंबरला सेमीफायनलचे सामने रंगणार आहेत.

मास्टर ब्लास्टरचं भाकित
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) सेमीफायनलमध्ये  (WC Semifinal) कोणते चार संघ दाखल होतील याचं भाकित वर्तवलं आहे. सचिन तेंडुलकरने सांगितेल्या चार संघांमध्ये आशियातल्या केवळ एकाच संघाचा समावेश आहे. सचिन तेंडुलकरच्या मते यजमान भारतासह ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि न्यूझीलंड हे चार संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश करतील. विशेष म्हणजे सचिनने बाबर आझमच्या पाकिस्तान संघाला सेमीफायनलमधून बाहेर केलं आहे. भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि न्यूझीलंड हे चारही संघ जबरदस्त फॉर्मात आहेत. त्यांच्या संघात अनुभवी आणि युवा खेळाडूंचा योग्य समतोल आहे असं सचिन तेंडुलकरने म्हटलंय.

सचिनच्या हस्ते स्पर्धेला सुरुवात
दरम्यान, आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेची सुरुवात करण्याचा मान भारतरत्न सचिन तेंडुलकरला देण्यात आला. सचिन तेंडुलकरने विश्वचषकाची ट्रॉफी मैदानावर नेली आणि स्पर्धेचं बिगुल वाजलं. विश्वचषकाची ट्रॉफी मैदानावर घेऊन जाण्याचा अनुभव आपल्या आयुष्यात मोलाचा असल्याचं सचिन सांगितलं. 2011 च्या क्वार्टर फायनलचा सामना टीम इंडियाने याच मैदानावर जिंकला होता. आता 12 वर्षांनी पुन्हा या मैदानावर ट्रॉफी घेऊन येताना खूप चांगलं वाटत असल्याचं सचिनने म्हटलंय. 

भारतीय संघ विजेता ठरेल
2011 विश्वचषक स्पर्धेत भारताने यजमानपद भूषवलं होतं आणि भारताने जेतेपद पटकावलं होतं. 2011 पर्यंत एकही यजमान देश विश्वचषक स्पर्धा जिंकला नव्हता. पण यानंतर ज्या देशात विश्वचषक स्पर्धा झाली तो देश विश्वविजेता ठरला. या इतिहासाची पुनरावृत्ती झाली तर यंदा विश्वचषक टीम इंडियाच्या हाती असले असंही सचिनने म्हटलं आहे. टीम इंडियाकडे चांगली बॅटिंग ऑर्डर आणि ऑलराऊंड बॉलिंग अटॅक आहे, असं सचिनने सांगितलं. 

विश्वचषक स्पर्धेच्या आठवणी
सचिन तेंडुलकरने विश्वचषकाच्या आपल्या आठवणीही शेअर केल्या. 1983 मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारताने पहिल्यांदा विश्वचषक पटकावला. भारताचा हा विजय टीव्हीवर पाहिला होत. पण त्यावेळी लहान असल्यामुळे त्याचं महत्व कळलं नव्हतं. त्यानंतर 1987 च्या विश्वचषक स्पर्धेत आपण बॉल बॉयच्या भूमिकेत होतो असं सचिनने म्हटलंय. 1992 मध्ये सचिन पहिल्यांदा भारताकडून विश्वचषक स्पर्धा खेळला. त्यानंतर 2011 पर्यंत सचिन सहा विश्वचषक स्पर्धा खेळलाय.