पाकिस्तानच्या 'या' क्रिकेटपटूचा हमासला पाठिंबा, भारतातून केलं ट्विट... कारवाईची मागणी

Israel-Hamas War: हमास या दहशतवादी संघटनेने इस्त्रालयवर हवाई हल्ले केले ज्यात शेकडो लोकांचा मृत्यू झाला. याला उत्तर देण्यासाठी इस्त्रालयनेही गाझा पट्टीत हल्ले केले. गेल्या तीन दिवसांपासून इस्त्रायल आणि पॅलेस्टाईनदरम्यान युद्ध पेटलं आहे. या दरम्यान पाकिस्तानच्या एका खेळाडूने हमासला खुला पाठिंबा जाहीर केला आहे. 

राजीव कासले | Updated: Oct 11, 2023, 06:09 PM IST
पाकिस्तानच्या 'या' क्रिकेटपटूचा हमासला पाठिंबा, भारतातून केलं ट्विट... कारवाईची मागणी title=

Pakistan Player Tweet on Gaza: दहशतवादी संघटना हमासने (Hamas) इस्त्रायलवर हल्ला केला आणि युद्धाला सुरुवात झाली. हमासने 20 मिनीटात 5000 हजार रॉकेट लाँचर सोडले. यामुळे इस्त्रायलमध्ये शेकडो नागरिकांचा मृत्यू झाला. अनेक इमारती जमिनदोस्त झाल्या. त्यामुळे हमासविरोधात जगभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. जगभरातील देश इस्त्रायलच्याबाजूने उभे राहिले आहेत. भारतानेही इस्त्रायलला पाठिंबा दिला आहे. अशात विश्वचषकात (ICC ODI World Cup-2023) खेळणाऱ्या एका पाकिस्तान खेळाडूने हमासला पाठिंबा दिला आहे. 

भारतातून केलं ट्विट
आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी बाबर आझमच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानचा संघ सध्या भारतात आहे. पाकिस्तान संघाने सलग दोन विजय मिळवलेत. पहिल्या सामन्यात नेदरलँडचा पराभव केला. तर दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेविरुद्ध ऐतिहासिक विजय मिळवला. श्रीलंकेने विजयासाठी दिलेल्या 345 धावांचं आव्हान पाकिस्तानने पूर्ण करत इतिहास रचला. पाकिस्तानच्या विजयाचा हिरो ठरला तो मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan). रिझवानने नाबाद 131 धावांची केळ केली. त्याला प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कारही मिळाला. पायात क्रॅम्प येत असतानाही रिझवान खेळपट्टीवर उभा राहिला आणि संघाला विजय मिळवून दिला.

मोहम्मद रिझवानच्या या खेळीचं कौतुक होत असतानाच त्याने केलेल्या एका ट्विटवरुन आता त्याच्यावर कारवाईची मागणी केली जात आहे. सोशल मीडियावर त्याला ट्रोल केलं जात आहे. 

जगातील मोजक्या देशांनीच दहशतवादी संघटना हमासला पाठिंबा दर्शवला आहे. या देशांचा गाझाला पाठिंबा आहे, यात पाकिस्तानचाही समावेश आहे. मोहम्मद रिझवानने विश्वचषक स्पर्धेत श्रीलंकेविरुद्ध शतक केल्यानंतर सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. यात त्याने आपलं शतक गाझातल्या पॅलेस्टाईन नागिरकांना समर्पित केलं. रिझवानने एक्सवर पोस्ट करत हमासला पाठिंबा दिला. रिझवानची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. 

भारतातून केली पोस्ट
रिझवानने आपल्या पोस्टमध्य म्हटलंय 'गाझा आमच्या बांधवांचं आहे. विजयात योगदान दिल्याने खूश आहे. विजयाचं संपूर्ण संघ आणि विशेषत: अब्दुल्ला शफीक आणि हसन अलीला श्रेय जातं. अद्भूत पाहुणचार आणि समर्थनासाठी हैदराबादच्या लोकांचा आभारी आहे' असं रिझवानने आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय.

कारवाईची मागणी
आयसीसीच्या कोणत्याही स्पर्धेत राजकीय पोस्टला परवानगी नाही. क्रिकेटपटूंना राजकीय गोष्टींपासून लांब राहिला हवं असं आयसीसीचं माननं आहे. खेळाडूंनी अशी कोणतीही कृती केली तर त्यावर कारवाई होऊ शकते. मोहम्मद रिझवानची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर युजर्सने अनेक कमेंट्स केल्या आहेत. अनेक युजर्सने रिझवानवर कारवाईची मागणी केली आहे. तुझा गाझाला पाठिंबा आहे की हमासला असा प्रश्न एका युजरने विचारला आहे. तर एका युजरने म्हटलंय गाझातील नागरिकांचा शतकासाठी कशी मदत झाली?