मुंबई : टीम इंडियाचा कसोटी कर्णधार (Team India Test Captain) विराट कोहली (Virat Kohli) गेल्या काही काळापासून आऊट ऑफ फॉर्म आहे. विराट गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने निराशाजनक कामगिरी करतोय. विराटला 2019 पासून आंतरराष्ट्रीय शतक लगावता आलेलं नाही. विराटच्या खराब कामगिरीचा फटका हा त्याला आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये (ICC Test Ranking) मोठा फटका बसला. टीम इंडियाच्या युवा खेळाडूंनीही विराटला काही बाबतीत मागे टाकलंय. आयसीसीने जारी केलेल्या कसोटी क्रमवारीत विराटची वाईट अवस्था आहे. (icc test ranking team india test captain virat kohli on spot 9th and rohit sharma 5th spot ravichandran ashwin 2nd position)
रोहित विराटच्या पुढे
'हिटमॅन' रोहित शर्मा (Hitman Rohit Sharma) दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. मात्र यानंतरही आयसीसी रँकिंगमध्ये रोहित विराटच्या पुढे आहे. रोहित शर्माचं टेस्ट रँकिंगमधील 5 वं स्थान कायम आहे. रोहितच्या नावे 781 रेटिंग्स पॉइंट्स आहेत.
विराटलाही टॉप 10 मधील स्थान कायम राखण्यात यश आलं आहे. मात्र ते स्थान विराटच्या लौकीकाला शोभा देणारं नाही. विराट 740 रेटिंग्स पॉइंट्ससह 9 व्या क्रमांकावर आहे. या दोघांव्यतिरिक्त टॉप 10 मध्ये टीम इंडियाचा एकही फलंदाजाचा समावेश नाही.
पहिल्या क्रमांकावर कोण?
आयसीसीच्या फलंदाजांच्या यादीत ऑस्ट्रेलियाचा मार्नस लाबुशेन (Marnus Labuschagne) पहिल्या क्रमांकावर आहे. लाबुशेनच्या नावे 924 पॉइंट्स आहेत. तर इंग्लंडचा कर्णधार जो रुट (Joe Root) आणि ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर विराजमान आहेत.
गोलंदाजांची स्थिती काय?
गोलंदाजांच्या यादीत टीम इंडियाचा अनुभवी ऑफ स्पिनर रवीचंद्रन अश्विनने दुसरं स्थान कायम राखलं आहे. अश्विन 861 रेटिंग्स पॉइंट्ससह दुसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे. अश्विन व्यतिरिक्त एकही गोलंदाजाचा पहिल्या दहात समावेश नाही.
पॅट कमिन्स अव्वल स्थानी
पॅट कमिन्सने गोलंदाजांच्या यादीतील पहिलं स्थान राखून ठेवलं आहे. पॅटकडे 895 पॉइंट्स आहेत. पॅट आणि अश्विननंतर तिसऱ्या स्थानी न्यूझीलंडच्या कायले जेमीन्सन तिसऱ्या स्थानी आहे. जेमीन्सने मोठी झेप घेत तिसरं स्थान मिळवलं आहे. जेमीन्सनने मोठी उडी घेत थेट 11 व्या स्थानावरुन तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली.
Steve Smith overtakes Kane Williamson
Kyle Jamieson launches into third spotThe latest @MRFWorldwide ICC Men’s Test Player Rankings
Full list: https://t.co/0D6kbTluOW pic.twitter.com/vXD07fPoES
— ICC (@ICC) January 12, 2022