यूएई : रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि केएल राहुल (K L Rahul) या सलामी जोडीच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर टीम इंडियाने (Team India) अफगाणिस्तानला (Afghanistan) विजयासाठी 211 धावांचे आव्हान दिले आहे. टीम इंडियाने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावून 210 धावा केल्या. टीम इंडियाकडून रोहित शर्माने सर्वाधिक 74 धावांची खेळी केली. तर केएल राहुलनेही 69 धावा चोपल्या. तर अखेरीस रिषभ पंत आणि हार्दिक पंड्या या जोडीने छोटेखानी पण महत्तवाची खेळी केली. अफगाणिस्तानकडून गुलाबदीन नैब आणि करीम जन्नत या जोडीने प्रत्येकी 1 विकेट घेतली. (icc t 20 world cup 2021 team india set 211 runs target for afghanistan)
अफगाणिस्ताने टॉस जिंकून टीम इंडियाला बॅटिंगसाठी भाग पाडले. बॅटिंगसाठी आलेल्या रोहित आणि केएल या जोडीने सुरुवातीपासून आक्रमक फलंदाजी केली. या दोघांनी अफगाणिस्तानच्या गोलंदाजाचा चांगलाच समाचार घेतला. पहिल्या दोन सामन्यात फ्लॉप ठरल्याने चांगली सुरुवात मिळवून देण्याचा दबाव या दोघांवर होता. मात्र या दोघांनी याचा दबाव न घेता जोरदार फटकेबाजी केली. या दोघांनी शतकी भागीदारी केली. या दरम्यान दोघांनी वैयक्तिक अर्धशतक पूर्ण केलं. रोहितने 74 धावांच्या खेळीत 8 चौकार आणि 3 शानदार सिक्स लगावले. तर केएलनेही 69 रन्सच्या इनिंगमध्ये 6 फोर आणि 2 सिक्स लगावले.
रिषभ पंतने 13 चेंडूत नाबाद 27 तर हार्दिक पंड्याने 13 चेंडूत 35 धावांची स्फोटक खेळी करत टीम इंडियाला 200 पार नेलं. टीम इंडियाच्या फलंदाजांनाी त्यांची जबाबदारी चोखपणे पार पाडली आहे. आता गोलंदाज या 211 धावांचं बचाव करतात की अफगाणिस्तान वरचढ ठरते, याकडे सर्वांचंच लक्ष असणार आहे.