ICC One Day Ranking : आयसीसीने एकदिवसीय क्रमवारी (ICC One Day Ranking) जाहीर केली आहे. या बॅटिंग रँकिंगमध्ये टीम इंडियाच्या शुबमन गिलने (Shubaman Gill) मोठी झेप घेतली आहे. शुबमनने थेट 45 स्थानांने उडी घेतली आहे. यासह गिल थेट रँकिंगमध्ये 38 व्या स्थानी पोहचला आहे. (icc odi ranking team india young opener shubman gill long jump 45 places to 38th in batsman ranking virat rohit babar azam)
टीम इंडियाने झिंबाब्वेला 3-0 असा व्हाइटवॉश दिला. या मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात शुबमनने पहिलंवहिवं शतक ठोकलं. शुबमनने 97 चेंडूत एकूण 130 धावांची खेळी केली.
टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीने आपलं 5वं स्थान कायम राखलंय. विराटच्या नावावर 744 रेटिंग्स पॉइंट्स आहेत. विशेष बाब म्हणजे विराटला झिंबाब्वे दौऱ्यासाठी विश्रांती देण्यात आली होती.
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मानेही सहावं स्थान कायम ठेवलंय. रोहितलाही झिंबाब्वे विरुद्धच्या मालिकेसाठी आराम देण्यात आला होता.
'गब्बर' शिखर धवनने झिंबाब्वे विरुद्ध 3 सामन्यात 154 धावांची खेळी केली. मात्र त्यानंतरही धवनला एका स्थानाचं नुकसान झालंय. धवनची 12 व्या स्थानी घसरण झाली. धवनने पहिल्या आणि तिसऱ्या सामन्यात अर्धशतकी खेळी केली होती.
दुसऱ्या बाजूला पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम एकूण 891 रेटिंग पॉइंट्ससह अव्वल स्थानी कायम आहे. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या रसी वन डर डुसेन दुसऱ्या स्थानी आहे.
गोलंदाजांच्या यादीत ट्रेंट बोल्ट पहिल्या क्रमांकावर आहे. तर बांगलादेशचा शाकिब अल हसन अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत नंबर वन आहे.